कोल्हापूर : गांधीनगर येथे एकल प्लास्टिकचा वापर करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांकडून १० हजार किलोचा साठा शनिवारी जप्त करण्यात आला. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून साधारणता एक डंपर भरेल एवढे प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने महापालिकेच्या हद्दीतील गांधीनगर येथे एकल वापर प्लास्टिकची तपासणी केली असता सचिन ट्रेडर्स, सद्गुरु ट्रेडर्स, अवतार ट्रेडर्स या व्यापाऱ्यांकडे सिंगल युज प्लास्टिकचा साठा आढळून आला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : फोंडा घाटातून अवजड वाहतूक सुरू; वाहनधारकांना दिलासा

पथकाने सचिन ट्रेडर्स व सद्गुरु ट्रेडर्स यांना प्रत्येकी पाच हजार रुपये व अवतार ट्रेडर्स यांना रुपये दहा हजार दंड करण्यात आला. तिन्ही व्यापाऱ्यांकडून दहा हजार किलो प्लॅस्टिकही जप्त करण्यात आले. ही कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, आरोग्य निरीक्षक माधवी मसुरकर,नंदकुमार पाटील, करण लाटवडे, सुशांत कवडे , सुशांत कांबळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली.