कोल्हापूर : पन्हाळागडाला लागून असलेल्या पावनगड येथील ४५ वर्षांपूर्वीचा अनाधिकृत मदरशा आज प्रशासनाने अखेर जमीनदोस्त केला. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणालाही घटनास्थळी फिरकू दिले नव्हते. काही हिंदुत्ववादी संघटनांकडून मदरशाबाबत तक्रारी प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर गेले आठवडाभर कारवाई अत्यंत गुप्ततेने सुरू होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार शुक्रवारी रात्री प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर हा मदरशा पाडण्यास सुरुवात झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : महानंद ‘एनडीडीबी’ला चालवण्यास देणे म्हणजे राज्य सरकारचे अपयश;राजू शेट्टी यांची टीका

छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या पावनगड या गडावर सध्या संपूर्ण मुस्लिम वस्ती राहण्यासाठी आहे. याचा गैरफायदा घेत १९७९ साली सय्यद या आडनावाच्या इसमाने बेकायदेशीर मदरशा पावनगड येथे बांधला. सद्यस्थितीत या मदरशात पश्चिम बंगाल व बिहारमधील ४५ मुले शिक्षण घेत होती. गुरुवारी सायंकाळी येथील सर्व मुलांना शिरोली येथील मदरशामध्ये नेण्यात आले. त्यानंतर मदरशा पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. मदरशा सुमारे दोन गुंठे क्षेत्रामध्ये बांधला गेला होता. हे क्षेत्र महसूलच्या अखत्यारीत येत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : राहुल गांधींच्या यात्रेने काँग्रेसची उरलेली राज्येही सत्तेतून जातील, राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

मदरशा पाडण्याबाबत प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळत गुरुवारी सायंकाळी सुमारे चारशे पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त बुधवार पेठेपासून ते पावनगडपर्यंत ठेवण्यात आला होता. यात पोलीस अधिक्षक, पन्हाळा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक ठाण मांडून बसले होते. मदरशा पाडण्याची कारवाई दुपारनंतर पूर्ण झाली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur at pavangad illegal madarsa demolished near panhala fort css
Show comments