कोल्हापूर : कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती, सुधारणांचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील पुतळा बदलण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतल्याबद्दल येथे भाजपाच्यावतीने शनिवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. लोकांना साखर पेढे वाटण्यात आले. दिल्लीतील शाहू महाराजांचा पुतळा त्यांच्या धिप्पाड व्यक्तीमत्वाला साजेसा नव्हता. त्यामुळे भाजपने तो पुतळा तत्काळ बदला, असे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना इमेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले होते.
पावसाळी अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी तो पुतळा राज्य शासन लवकरच बदलणार असल्याबाबत जाहीर केले. या संदर्भात भाजपने दसरा चौकात आनंदोत्सव साजरा केला. जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, राहूल चिकोडे, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो,छत्रपती शिवाजी महाराज कि जय, छत्रपती संभाजी महाराज कि जय अशा घोषणा परिसर दणाणून सोडला.
जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, राजू मोरे, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, माधुरी नकाते, दिग्विजय कालेकर, अभिजित शिंदे, प्रकाश सरनाईक, राजू जाधव, रुपाराणी निकम, गिरीष साळोखे, अनिल कामत, अमोल पालोजी, सयाजी आळवेकर, अशोक लोहार, किरण नकाते, सतीश आंबर्डेकर, शामली भाकरे, श्वेता गायकवाड, पद्मजा गुहाघरकर, सरिता हरुगले, छाया ननवरे, नरेंद्र पाटील, दिलीप बोंद्रे, प्रताप देसाई, सुदर्शन सावंत, सचिन सुतार, विवेक कुलकर्णी, अजित सूर्यवंशी, सुमित पारखे, प्रीतम यादव, ओंकार खराडे, धीरज पाटील, महादेव बिरंजे, बंकट सूर्यवंशी, बापू राणे, संदीप व्हडगे, विश्वजीत पवार, युवराज शिंदे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.