कोल्हापूर : इचलकरंजी येथील आरटीओ कार्यालयात तपासणीसाठी आलेल्या ट्रकची कागदपत्रं बनावट होती. यातून शासनाचा महसुल बुडवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात असीम चाँदसाहब मुजावर ( रा. कवठेपिरान, ता.मिरज) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय गणपती इंगवले (वय 56, रा. मुलुंडवेस्ट, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
हेही वाचा : इचलकरंजी महापालिकेची अतिक्रमण मोहीम दुसऱ्या दिवशीही सक्रिय; हातगाडे, फलक जप्त
येथील आरटीओ कार्यालयात मिरज तालुक्यातील कवठेपिरान इथं राहणारे असीम मुजावर हे ट्रक तपासणीसाठी घेऊन आले होते. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी ट्रकच्या कागदपत्रं तपासली असता वाहन नोंदणी पत्र मुळ नसून त्याचा फोटोप्रिंट होती. मुजावर यांनी सादर केलेल्या शपथपत्रात अरुणाचल प्रदेश आरटीओ कार्यालाकडून एनओसी घेतली असून सर्व कागदपत्रं ओरीजनल असल्याची कागदपत्रं गाडी ट्रान्स्फर होण्यासाठी कोल्हापूर आरटीओ कार्यालयात जमा केल्याचं सांगितलं. त्यामुळं ट्रकचा चेस नंबर तपासला असता बनावट असल्याचा संशय आला. त्यामुळं त्या ट्रकची कार्यालयीन माहिती काढली असता तो लक्षद्वीप राज्यातील होता. त्यामुळं तो ट्रक अरुणाचल प्रदेश राज्यात वाहन स्थलांतरीत होण्याची शक्यता कमी असल्यानं ट्रक कंपनीच्या अधिकृत वाहन चेसीस नंबर लिहण्याची पद्धत पडताळणी केली ट्रक चेस नंबर बनावट असल्याचं निदर्शनास आलं. यातून शासनाचा महसुल बुडवण्यासाठी बनावट कागदपत्रं केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात मुजावर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.