कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांचे उचित स्मारक उभारण्यात येईल, असे काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतीश पाटील यांनी सांगितले. तर, पी. एन. पाटील यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याची संकल्पना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली.

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी जिल्हा काँग्रेस भवनात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
eknath shinde comment ladki bahin yojana daryapur vidhan sabha
मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !

हेही वाचा : पेनाच्या दुनियेतील किमयेची अनोखी सफर अनुभवण्यास कोल्हापूरकरांची गर्दी

भोगावतीला मदत करावी

यावेळी जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी पी. एन. पाटील यांच्या भोगावती साखर कारखान्याला सर्वांनी मदत करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

श्रीमंत शाहू महाराज, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगांवकर, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार संजयबाबा घाटगे, के पी पाटील, राजीव आवळे, श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड, व्ही बी पाटील, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे सुनिल मोदी, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, ए वाय पाटील, आपचे संदीप देसाई , कॉम्रेड दिलीप पवार, चेतन नरके, उदय नारकर, आर के पोवार, सुर्यकांत पाटील बुध्दिहाळकर, बाबासो पाटील आसुर्लेकर, सरलाताई पाटील , सुप्रिया साळोखे, मनसेचे प्रसाद पाटील, दगडू भास्कर, राहूल खंजीरे, गोकुळचे विश्वास पाटील, रामराजे कुपेकर, भैया माने, कॉम्रेड चंद्रकांत यादव, अतुल दिघे, वसंतराव मुळीक, सतीशचंद्र कांबळे, शेकापचे केरबा पाटील, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, राजू लाटकर, कॉग्रेस, भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना( ठाकरे गट), मनसे,आप कम्युनिस्ट पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, शेकाप, जिल्हा बॅकेचे संचालक, गोकुळ संचालक, बाजार समितीचे संचालक सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.