कोल्हापूर : कागल येथील शाहू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी एस.बी. रिशेलर्स या कोल्हापूर मधील स्थानिक कंपनीने विकसित केलेल्या ऊस तोडणी यंत्राचे प्रात्यक्षिक झाले. यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शाहू साखर कारखान्यात नवनवीन तंत्रज्ञान अवलंबण्यास नेहमीच प्राधान्य दिले. त्यामध्ये आम्ही आणखी भर घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन कोल्हापूर अंतर्गत स्थानिक उद्योजकांनी विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानास प्रोत्साहन देत आहोत. स्थानिक व्यावसायिक व उद्योजक यांच्या नवतंत्रज्ञानास आमचे नेहमीच प्रोत्साहन राहील. यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे,उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी.पाटील, पियुष झाला, नितीश चौरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापुरात विकसित केलेल्या ऊस तोडणी यंत्राचे शाहू कारखाना प्लॉटवर प्रात्यक्षिक
कागल येथील शाहू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी एस.बी. रिशेलर्स या कोल्हापूर मधील स्थानिक कंपनीने विकसित केलेल्या ऊस तोडणी यंत्राचे प्रात्यक्षिक झाले.
Written by लोकसत्ता टीम
कोल्हापूर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-02-2024 at 13:44 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur demonstration of sugarcane harvester machine at shahu factory plot css