कोल्हापूर : कोल्हापूरचे तापमान वाढ रोखण्याचा निर्धार बुधवारी पर्यावरण दिनी येथील पर्यावरण प्रेमींनी केला. त्यासाठी कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी उन्हाळ्यात देशभरात तापमानाच्या काट्याने उच्चांक केला. कोल्हापूर देखील त्याला अपवाद नाही. उन्हाळ्यात यावर्षी महिना – दीड महिना ३९ च्या ठोक्यावर अडून होता एप्रिल महिन्यात तर चक्क तो ४१ च्या वर जाऊन आला. कोल्हापूरातील वाढलेले तापमान हा कोल्हापूरकरांसाठी नक्कीच एक गंभीर प्रश्न बनलेला आहे. याला अनेक कारणे जबाबदार आहेत. जागतिक तापमान वाढ, अल निनो परिणाम तसेच स्थानिक कारणे देखील या परिस्थितीला कारणीभूत आहेत.

तरी, ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूरच्या या वाढलेल्या तापमानासंदर्भात उहापोह करण्याकरता ‘ कोल्हापूर ४१ अंश सेल्सिअस ‘या चर्चासात्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील., कुलसचिव डॉ. व्हि. एन. शिंदे, पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आसावरी जाधव , प्रादेशिक अधिकारी साळोखे, उदय गायकवाड आदीचे हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Ajit Pawar Jayant Patil x
Jayant Patil : “अरे बाप नाही, तुझा काकाच…”, जयंत पाटलांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती

हेही वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन; काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस

यानंतर चर्चासत्रात विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी ‘शहरी उष्णताद्वीप’ या विषयावर मांडणी केली. यामध्ये शहरी भागात उष्णता वाढवणाऱ्या विविध कारणांचा जसे की, डांबरीकरण, काँक्रीटचा अति वापर, उंच इमारतींमुळे कमी झालेले वायुविजन, कमी झालेले वृक्ष आच्छादन या कारणांच्याबद्दल माहिती सांगण्यात आली. यानंतर, उदय गायकवाड यांनी कोल्हापूर शहराच्या विशिष्ठ अशा गुणधर्मांचा आणि सांख्यिकीचा आलेख मांडला, यामध्ये गेल्या १०० वर्षात झालेली लोकसंख्या वाढ, बदललेला जमीन वापराचा पॅटर्न, मोकळ्या जागांचे झालेले हस्तांतरण, बागांची दुरावस्था, रस्त्याकडेची कमी झालेली झाडी असे अनेक मुद्दे मांडले आणि या प्रश्न हाताळण्यासाठी कोणत्या गोष्टी अंगिकाराव्या लागतील याचा उल्लेख केला.

हेही वाचा : संजय मंडलिक यांच्या पराभवाचे चिंतन; महायुतीच्या नेत्यांची बैठक

त्यानंतर चर्चासत्रात, आर्किटेक्ट वंदना पुसाळकर, गार्डन्स क्लबच्या पल्लवी कुलकर्णी, अनिल चौगुले, अजिंक्य बेर्डे यांनी देखील आपली मते मांडली. यावेळी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, श्री. साळोखे यांनी शासनाची भूमिका, नेट झिरो च्या दृष्टीने वाटचाल आणि प्रत्येकाने कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या दृष्टीने कशी पाऊले उचलावत याबाबत मार्गदर्शन केले. चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे डॉ. बाचूळकर यांनी त्यांच्या मांडणीमध्ये वृक्षांचे महत्व वेगळ्या पद्धतीने अधोरेखित केले. नवीन झाडे लावण्याबाबत आणि असणारी झाडे टिकवण्याबाबत सर्वानीच अत्याधिक गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. चंगळवादी जीवनशैलीने पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे आणि असेच चालू राहिले तर आपल्याला या संकटापासून कोणीही वाचवू शकत नाही असे ते म्हणाले. शेवटी, अध्यक्षीय समारोप करताना, विभागाचे माजी विभागप्रमुख, डॉ. प्रकाश राऊत यांनी, विद्यापीठाची वृक्ष संवर्धनातील भूमिका स्पष्ट केली, विद्यापीठाचे विशाल प्रांगण शहराचे फुफुस म्हणून कार्यरत आहे, ते अधिक चांगल्या पद्धतीने कसे विकसित करता येईल याबद्दलचा आराखडा बनवण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.