कोल्हापूर : कोल्हापूरसह जिल्ह्यात विविध ठिकाणी, मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. सजवलेल्या मंदिरात भर पावसात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भक्तगण गुरुचरणी लीन होत होते.

येथील अंबाबाई भक्त मंडळाचे वतीने देवतांचे ॲड. धनंजय पठाडे यांचे हस्ते करण्यात आले. महाप्रसाद वाटपाच्या नवीन ट्रॉलीचे पूजन कृष्णराज महाडिक यांचे हस्ते करणेत आले. पुष्कराज क्षीरसागर, अध्यक्ष संजयसिंह साळोखे, नंदू घोरपडे, शिला माने आदी उपस्थित होते.

हेही वाचा : कोल्हापूर : नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात दुसरा दक्षिणद्वार सोहळा; भाविकांनी केले पवित्र स्नान

नृसिंहवाडीत पावसात गर्दी

अखंड दत्त नामाचा गजर करत हजारो भक्त गुरु दत्त चरणी लीन झाले. काकडारती, भक्त गणांचे अभिषेक पंचामृत,श्रीच्या उत्सव मूर्तीवर षोडशोपचार महापुजा, पवमान सुक्त पठण आदी विधी करण्यात आले. मुख्य रांगे बरोबरच मुख दर्शन रांग व क्लोज सर्किट टीव्ही ची सोय केली होती. कृष्णा नदीत स्पिडबोट तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी दर्शनासाठी एकेरी मार्ग केल्याने व्यापारी, व्यावसायिक यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : कोल्हापूर : अलमट्टीतून दोन लाख क्यूसेक विसर्ग करून महापुरावर नियंत्रण आणण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

इचलकरंजीत सेवा कार्य

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रामध्ये दिवसभर विविध अध्यात्मिक सेवा करण्यात आल्या. महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते पूजा, अभिषेक, आमदार प्रकाश आवाडे, माजी नगराध्यक्ष्या किशोरी आवाडे यांच्या हस्ते आरती तसेच विकासकामांचा शुभारंभ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते नैवेद्य आरती करण्यात आली.