कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये राजकीय वाद वाढत आहे. यातूनच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी सतेज पाटील यांच्यात इतका बालिशपणा येतो कोठून, असा परखड प्रश्न उपस्थित केला. कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यावर हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज सर्वांचे आदर्श आहेत. त्यांनी राजकारणात यावे किंवा न यावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, अशी टिपणी केली होती. त्यावर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल आदर असेल तर त्यांना महायुतीने बिनविरोध विजयी करावे, असे आवाहन केले होते. सतेज पाटील यांच्या या विधानाकडे आज लक्ष वेधले असता पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, असे आवाहन करण्या इतका बालिशपणा सतेज पाटील यांच्याकडे कोठून आला. राजकारणात असे होत नाही, असे म्हणत बिनविरोधची शक्यता फेटाळून लावली.
“सतेज पाटील यांच्याकडे बालिशपणा कोठून येतो”, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये राजकीय वाद वाढत आहे.
Written by लोकसत्ता टीम
कोल्हापूर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-03-2024 at 16:19 IST
TOPICSमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionसतेज पाटीलSatej Patilहसन मुश्रीफHasan Mushrif
+ 1 More
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur guardian minister hasan mushrif criticizes satej patil on the issue of shahu maharaj css