कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीने निवडणूक लढण्याचे निश्चित केले आहे. ठाकरे सेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आजच्या बैठकीत दिसून आली असून तिरंगी लढतीची चिन्हे दिसू लागली आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी मविआने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना उमेदवारी लढवण्याचा प्रस्ताव दिला होता . त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मविआतर्फे उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा…कोल्हापूरच्या काळम्मावाडी नळ पाणी योजनेच्या कामात घोटाळा; धनंजय महाडिक यांचा आरोप
त्यानुसार बुधवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील,दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, ठाकरे सेनेचे संजय पवार, संजय चौगुले, विजय देवणे, वैभव उगळे हे जिल्हाप्रमुख , उल्हास पाटील, सत्यजित पाटील सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर आदी माजी आमदार, शरदनिष्ठ गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही, बी, पाटील, माजी आमदार राजीव आवळे, प्रदेश सचिव मदन कारंडे, गोकुळचे संचालक अमर पाटील, करण गायकवाड आदींची बैठक झाली.
हेही वाचा…मोदींकडून विकसित भारताचे स्वप्न साकार, काँग्रेसने आजवर केवळ पोकळ स्वप्ने दाखवली; खासदार धनंजय महाडिक
त्यात मविआने हातकणंगले मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात येऊन उमेदवार म्हणून पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील, हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या नावांना पसंती देण्यात आली. यावेळी जयंत पाटील यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.