कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या दर्शनाला जात असताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला रविवारी दुपारी अपघात घडला. कोल्हापूर – रत्नागिरी मार्गावर रजपुतवाडी येथे हा अपघात घडला. मंत्री सावंत हे सुखरूप असले तरी त्यांचे स्वीय सहाय्यक रविकांत जाधव हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आज गारगोटी (ता. भुदरगड) येथे शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण सोहळा आयोजित केला होता, त्यास उपस्थित राहिल्यानंतर मंत्री सावंत यांनी कोल्हापूर करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले.

हेही वाचा : कोल्हापूर : पाटगाव प्रकल्पाचे पाणी अदानींच्या प्रकल्पाला दिल्यास जलसमाधी घेऊ, अनफ खुर्दच्या शेतकऱ्यांचा इशारा

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Indian Railways Compensation for Death| Compensation for Natural Death in Trains
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई मिळते का? काय आहेत रेल्वेचे नियम?
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
karjat jamkhed latest news in marathi
कर्जत : जामखेड जवळ बोलेरो जीप विहिरीत पडून चार ठार
Four dead in Gujarat due to kite string injuries
नायलॉन मांजामुळे सात जणांचा मृत्यू; मुंबईत १९ जणांविरोधात कारवाई

त्यानंतर ते कोल्हापूर जवळील वाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवाच्या दर्शनाला जात होते. रजपुतवाडी येथून त्यांच्या वाहनांचा ताफा जात होता. यावेळी मागील वाहनाने मंत्री सावंत यांच्या मोटारीस जोरदार धडक दिली. ती इतकी जोरदार होती की वाहनाच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला होता. तरीही या अपघातात मंत्री सावंत हे सुखरूप राहिले. त्यांना कोणतीही इजा पोहोचली नाही. ते दुसऱ्या शासकीय वाहनाने जोतिबाकडे रवाना झाले. देवदर्शन घेऊन ते पुढे निघून गेल्याचे सूत्रांनी सांगितले. या अपघातात त्यांचे स्वीय सहाय्यक रविकांत जाधव किरकोळ जखमी झाले.

Story img Loader