कोल्हापूर: श्री. काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. याच सेवा शृंखलेत आता ‘ ना नफा ना तोटा ‘ या तत्वावर मोफत व माफक दरात पारदर्शक सेवा देणासाठी अत्याधुनिक असा हृदयरोग विभाग कार्यरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. गणेश इंगळे यांनी गेली १२ वर्ष हृदयरुग्णांसाठी प्रसिद्ध अशा नामांकित संस्थेत सेवा दिली आहे. ते आता सिद्धगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपली आरोग्य सेवा समाजातील सर्वच स्तरातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यरत झाले आहेत. त्यांच्या आरोग्य कौशल्याचा समाजातील गरजू लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळवारी काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केले.

हेही वाचा : स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजे नालेसाठी घोड्याची खरेदी ! सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रीपेड विरोधी चळवळ राबवावी – प्रताप होगाडे

यावेळी बोलताना प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. गणेश इंगळे म्हणाले, ‘पुणे ते बेंगलोर या परिक्षेत्रात धर्मादाय श्रेणीत पहिल्यांदाच अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, वेगवेगळ्या चाचण्यांसह एकाच छताखाली हृदयरुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी लहानवयातील तरुणांनाही हृदयरोगाशी सामना करावा लागत आहे. आज हृदयरुग्णांवर अत्याधुनिक उपचार घेणे हि क्लिष्ट बाब झाली आहे. आज सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये हृदयाशी संबंधित कोरोनरी अँजिओग्राफी, कोरोनरी अँजिओप्लास्टी, पेरीफेरल इंटरव्हेंशन- रिनल अँजिओग्राफी , रिनल अँजिओप्लास्टी , कायमस्वरूपी पेसमेकर रोपण हे उपचार केले जातात. तसेच स्ट्रक्चरल हार्ट इंटरव्हेंशनसाठी आवश्यक उपचार हि दिले जातात. याशिवाय एएसडी, पीडीए, व्हीएसडी, कोअरक्टोप्लास्टी उपचार तसेच हृदयाची शस्त्रक्रिया हि केली जाते. हे सर्व उपचार सिद्धगिरी रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्वानुसार मोफत, माफक व पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ह्रदयरुग्णांकरिता उपचार करण्यासाठी ‘सिद्धगिरी हृदयरोग’ विभाग आशेचा किरण ठरेल. या सेवेचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .

हेही वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ वादातून वृद्ध आईचा मुलाने केला खून

या वेळी अधिक माहिती देताना वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश भरमगौडर म्हणाले, पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार हा विभाग कार्यान्वित आहे. या विभागामुळे वंध्यत्व उपचार अत्यंत पारदर्शकपणे करण्यास अधिक हातभार लागणार आहे. या विभागात उपचार प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर गुणवत्तेशी तडजोड न करता अत्यंत अत्याधुनिक अशी कॅथ लॅब सह अन्य अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी डॉ. गणेश इंगळे यांनी या विभागाच्या विविध तंत्रज्ञानाची माहिती दृक-श्राव्य (व्हिडीओ) माध्यमांच्या द्वारे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली. विवेक सिद्ध यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सिद्धगिरी हॉस्पिटलचे राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, सत्याप्पा बाणे, दयानंद डोंगरे व अभिजित चौगले आदि उपस्थित होते.