कोल्हापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने इचलकरंजीतील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँक, गंगाजळी संपल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करत होती. ४ डिसेंबर पासून, रिझर्व्ह बँकेने नूतन बँकेसाठी सर्व प्रकारचे व्यवहार तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असल्याने भाजप, संघ परिवाराशी निगडित या बँकेचे अस्तित्व कायमचे लयाला गेले आहे. शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेला दिवंगत अध्यक्ष शंकरराव पुजारी यांच्या काळात उर्जितावस्था प्राप्त झाली होती. त्यांच्या पश्च्यात त्यांचे सुपुत्र प्रकाश पुजारी यांच्याकडे अध्यक्षपद आल्यानंतर बँकेची अधोगती सुरु झाली. मे महिन्यात या बँकेवर रिझर्व्ह बँकेने ६ महिन्यांसाठी निर्बंध लादले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आदेशात असे नमूद केले आहे की, शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड हि ४ डिसेंबरपासून कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देऊ शकणार नाही. बँकेला ठेवी स्वीकारण्यास किंवा निधी वितरित करण्यास पूर्णपणे प्रतिबंधित केले आहे. या सहकारी बँकेने बँकिंग सेवा प्रदान करणे सुरू ठेवण्यासाठी आवश्यक निकषांची पूर्तता केलेली नाही. शिवाय, भविष्यातील कमाईसाठी कोणतीही ठोस योजना तयार करण्यात बँकेला अपयश आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेचा परवाना रद्द करण्यात येत आहे.

हेही वाचा : मग ते वानखेडे , ब्रेबाँन… कोठेही शपथ घेऊ शकतात; हसन मुश्रीफ यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांना टोमणा

ग्राहकांना दिलासा

बँकेच्या ग्राहकांना ठेव विम्याच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षित केला जातो. त्यामुळे नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केल्यानंतर ५ लाख किंवा त्यापेक्षा कमी रक्कम जमा केलेल्या ग्राहकांना संपूर्ण प्रतिपूर्ती मिळेल. लाखांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी आहेत असे ठेवीदार केवळ ५ लाख रुपयांच्या निर्दिष्ट मर्यादेपर्यंत दावा करू शकतात.

अध्यक्षांसह संचालक अटक

शंकरराव पुजारी नुतन नागरी सहकारी बँकेमध्ये ३ कोटी ५८ लाख रुपयांचा अपहार प्रकरणी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी, त्यांची पत्नी कांचन पुजारी , शाखाधिकारी मलकारी लवटे, संचालक आदींना ऑगष्ट महिन्यात अटक झाली होती. यामुळे या बँकेच्या प्रतिमेला मोठा तडा गेला होता. आता तर बँक इतिहासजमा होत आहे.

हेही वाचा : कोल्हापुरात मनसेने इंग्रजी फलकांना काळे फासले

सहकारी बँकांना घरघर

इचलकरंजीतील संस्थान काळातील अर्बनसह पीपल्स, शिवनेरी, चौंडेश्वरी, साधना, कामगार, जिव्हेश्वर, महिला आदी सहकारी बँका बंद पडल्या. शिवम, लक्ष्मी विष्णू, श्रीराम या सहकारी बँका सक्षम व्यवस्थापनाकडे चालवायला देण्याची नामुष्की ओढवली.