कोल्हापूर : बाळाबाई, रेणुका ताई, सखुबाई… तीन वयोगटातील तीन महिला. साम्य मात्र एकच. त्यांच्या डोक्यातील जटा. जटांचे जोखड वाहत असलेल्या या तिघींचे जटा निर्मूलन बुधवारी सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने पार पडले. एकाच दिवशी तिघिंचे जटा निर्मूलन हे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात काम करणाऱ्या तीन सफाई कामगार महिला आज जट मुक्त झाल्या. त्याची ही कथा. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्हि. एन.शिंदे यांच्या परवानगीने तसेच एनएसएस विभागप्रमुख चौगुले सर यांच्या सहकार्याने आरोग्य विभागामध्ये तीन महिलांचे जटा निर्मूलनाचे कार्य आज पार पडले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जटा निर्मूलन करताना लागणाऱ्या आरोग्य विषयक गोष्टीची पूर्तता करत अतिशय आनंदाने यामध्ये सहकार्य केले. आरोग्य विभाग, एनएसएसचा सगळा स्टाफ यांच्या हजेरीत हा जट निर्मूलनाचा कार्यक्रम पार पडला. तिघीही महिलांच्या चेहऱ्यावरती अतिशय आनंद होता. बाळाबाई, रेणुका ताई, सखुबाई अशा या तीन महिला. नेहमीप्रमाणेच प्रत्येकीची कहाणी वेगळीच देव, देवीच्या भयान, घरात येणाऱ्या वेगवेगळ्या संकटाने. अनारोग्य, शिक्षणाचा अभाव आर्थिक दुरावस्था आणि त्यातून अज्ञान अंध:कार अंधश्रद्धा यांचा पगडा कायमच होता. यामध्ये आज विद्यापीठातल्या अनेकांच्या सहकार्याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते गिता हसुरकर, यश आंबोळे, विद्यापीठात सिनेट सदस्य अभिषेक मिठारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा : आंदोलनानंतर कोल्हापूर महापालिकेला जाग; ३० मे पूर्वी केवळ पाच रस्ते पूर्ण करण्याचे ठेकेदारास आदेश

श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी भिन्न आहेत. समाजातील चांगल्या गोष्टीवर श्रद्धा जरूर असावी. पण कोणत्याच बाबतीत अंधश्रद्धा असू नये. जटा वाढविणे, देवीच्या नावाने मुलींना देवदासी म्हणून सोडणे अशा प्रथा या अज्ञान व अंधश्रद्धेतून निर्माण झाल्या आहेत. कोणताही देव, देवता जटा वाढवायला सांगत नाही. जटा काढल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा देवीचा कोप होईल ही भीती मनातून काढून टाकावी. उच्चशिक्षित, उच्चभ्रूं समाजातील स्त्रियांच्या केसात जटा कधीच नसतात. त्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेल्या दलित, पीडित व बहुजन समाजातील अशिक्षित, अज्ञानी महिलांमध्ये दिसतात. यांसारख्या अनेक अनिष्ट प्रथा, रुढी व परंपरा या केवळ अज्ञानातून, अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या आहेत. तेव्हा जटा असणाऱ्या महिलांनी जटामुक्त व्हावे व आपला त्रास नाहीसा करावा, असे विचार यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur jata elimination of three women css
Show comments