कोल्हापूर : राधानगरी भुदरगड तालुक्याचे माजी आमदार के. पी. पाटील यांची महाविकास आघाडीची सलगी वाढत चालली असताना त्याचे राजकीय परिणामही दिसू लागले आहेत. काल रात्री के . पी. पाटील हे अध्यक्ष असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागांनी छापा टाकला. तेथे रात्रभर १५ अधिकारी माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते. या कारवाईविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. रात्रभर तपासणी करुन सकाळी हे पथक कारखान्याबाहेर पडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राधानगरी भुदरगड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना मोठे मताधिक्य मिळाले. या निवडणुकीत के. पी. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला मदत केल्याची चर्चा आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूक ते महाविकास आघाडी कडून लढणार असल्याची मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : आमदार आवाडेंवर टीका करणाऱ्या विरोधकांनी कोणता विकास केला; ताराराणी आघाडीचा खडा सवाल

याला शह देण्याच्या हालचाली आता महायुतीतून सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उत्पादन शुल्क खात्याच्या या कारवाईकडे पाहिले जात आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी डिस्टलरी प्रकल्प व कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती पुढे येत आहे. माजी आमदार के. पी. पाटील हे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे विश्वासू आहेत. तसेच ते महायुतीत सामील असून सध्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur kp patil to join mahavikas aghadi after state excise department investigation css