कोल्हापूर : महाविकास आघाडी, इंडिया आघाडीने खासदार प्रा. संजय मंडलिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात शुक्रवारी निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली आहे. इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या विरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव रघुनाथ विष्णू कांबळे (रा. साळोखे मळा, कदमवाडी) यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

तर, संजय मंडलिकांना मताधिक्य देणाऱ्या तालुक्याला पाच कोटी विकास निधी देण्याची घोषणा करणाऱ्या राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी मतदारांना अमिष दाखविल्याबाबत तक्रार दाखल केली आहे.

supriya sule
लेकी, नाती १५०० रुपयांत विकत घेता येत नाहीत- सुप्रिया सुळे
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
s Jaishankar
देशाची प्रतिमा मलिन करणे अयोग्य, मणिपूरप्रकरणी परराष्ट्र मंत्र्यांचे विरोधकांना खडेबोल
Harshvardhan Patil On Ajit Pawar
Harshvardhan Patil : “मी पहाटे उठून कुठे जात नाही”, हर्षवर्धन पाटील यांची अजित पवारांवर खोचक टीका
Selected reactions to the article pracharak sanghacha kana
पडसाद : हे कौतुक फार दिवस पुरणार नाही…
Jayashree Thorat and Sujay Vikhe Patil
Sangamner News Update: “माझ्या मुलाच्या सभेत विकृती…”, भाजपा नेत्याच्या अश्लाघ्य विधानानंतर सुजय विखेंच्या आई शालिनी विखे संतापल्या
BJP leader Vasantrao Deshmukh on Jayashree Thorat
Jayashree Thorat: “माझी लाडकी बहीण म्हणायचं आणि लेकीवर भर सभेत..”, भाजपा नेत्याच्या अश्लाघ्य विधानानंतर विरोधकांचा संताप
NCP announced candidate from Sharad Pawar group in Murtijapur constituency there is split in party
राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटन सचिवाची सोडचिठ्ठी…सम्राट डोंगरदिवेंसमोर डोंगराएवढे…

हेही वाचा…सामान्य जनतेने माझी निवडणूक हातात घेतली; एक व्होट व एक नोट प्रमाणे लोकवर्गणीला प्रतिसाद – राजू शेट्टी

भाकपचे रघुनाथ कांबळे यांनी तक्रार अर्जात असे म्हटले आहे, कोल्हापूरच्या संस्थानच्या सर्वच राजघराण्यातील उत्तराधिकारी राजांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेसाठी भरीव योगदान दिले आहे. नेसरी (गडहिंग्लज) येथील सभेत खासदार मंडलिकांनी ‘आत्ताचे श्रीमंत शाहू छत्रपती हे खरे वारसदार नाहीत. ते कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. असे वक्तव्य केले. श्रीमंत शाहू छत्रपती हे हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम तसेच कोल्हापूर संस्थानच्या दत्तक संबधिच्या कायद्यान्वये, कायदेशीरदृष्ट्या कोल्हापूर संस्थानामध्ये दत्तक आले आहेत. हिंदू वारसा कायद्याप्रमाणे क्लास वन वारस आहेत. भारतातील प्रचलित कायद्याप्रमाणे दत्तक मुलाच्या पोटी जन्मलेल्या मुलाप्रमाणे स्थान दिले आहे. त्यामुळे शाहू छत्रपती हे कोल्हापूर संस्थानचे खरे वारस आहेत.

एखाद्या अडाणी माणसाने किंवा कमी शिकलेल्या माणसाने अशा प्रकारची वक्तव्ये करणे मी समजू शकलो असतो. मंडलिक हे देशाच्या सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेचे सभासद आहेत. या सभागृहाला कायदेमंडळ सुद्धा म्हटले जाते. ज्या सभागृहात साधक बाधक चर्चा केल्यानंतर कायदे तयार केले जातात. अशा सभागृहाचे सभासद व पेशाने प्राध्यापक असलेल्या खासदार मंडलिक यांनी धांदात खोटी, जनतेची व समाजाची दिशाभूल करणारी वक्तव्ये केल्याने सामाजिक उपद्रव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी विविध गटामध्ये शत्रुत्व वाढविण्यास व समाजामध्ये एकोपा ठरण्यास बाधा ठरेल असे कृती केली आहे. ऐन निवडणूकीच्या काळात त्यांनी शांतता भंग घडविण्याच्या उद्देशाने खोटी व चुकीचे विधाने केली आहेत. शाहू छत्रपतींच्याबद्दल जनतेच्या मनात चांगली भावना असताना त्यांची प्रतिमा मलिन करण्याची कृती खासदार मंडलिकांनी केली असल्याने त्यांच्यावर त्वरीत फौजदारी गुन्हा दाखल कराव अशी मागणी केली आहे.

हेही वाचा…छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध

महाडिकांनी आमिषे दाखवली

नेसरी (गडहिंग्लज) येथील महायुतीचे शिवसनेचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भाजपच्या मेळाव्यात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मंडलिकांना मताधिक्य देणाऱ्या तालुक्याला पाच कोटी विकास निधी देण्याची घोषणा केली होती. या वक्तव्याच्या विरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. महाडिकांची घोषणा लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२३ मध्ये ‘लाचलुचपत’ या शब्दाची व्याख्या दिली आहे, त्या व्याख्येमध्ये तंतोतंत समाविष्ठ होत असल्याचे निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.