कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत एकेक कार्यकर्ता जवळ करून प्रचाराला गती देण्यावर राजकीय पक्षांनी भर दिला असताना दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात बरेच प्रमुख पदाधिकारी, दुसऱ्या फळीतील प्रमुख कार्यकर्ते हे उघडपणे विरोधी गटाला साथ देऊन प्रचारात सक्रिय झाले आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केलेल्या उमेदवारावर कारवाईचा बडगा उगारण्याची भूमिका सर्वच पक्षांनी घेतल्याचे दिसत असताना विरोधकांना उघडपणे मदत करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांसोबत कारवाई ऐवजी सबुरीची भूमिका सर्वपक्षांनी घेतल्याने त्याची चर्चा आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांत लक्षवेधी लढत होत आहे ती कागलमध्ये. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समरजितसिंह घाटगे यांच्यात निकराची लढत होत आहे. या मतदारसंघात गेल्या काही निवडणुकांमध्ये तिरंगी लढत झाली आहे. येथे पाच वेळा आमदार झालेले मुश्रीफ यांना शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे हे त्यांचे महाविद्यालयीन मित्र आव्हान देत आले आहेत. या दोघांची लढत नुरा कुस्ती म्हणून पाहिली जात असे.

Top leaders including Prime Minister Home Minister and Priyanka Gandhi are touring Vidarbha
गृहमंत्री शहा यांचा दौऱ्यात नक्सली एलिमेंट नजरेत,शहा चहा घेत नाही म्हणून मग,,,
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
devendra fadnavis vote jihad
“धर्माचा वापर करून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते वोट जिहाद करत आहेत”, फडणवीस यांची टीका
nitin gadakari in Ichalkaranji
इंदिरा गांधी यांच्याकडूनच घटनेची सर्वाधिक मोडतोड ; नितीन गडकरी
vadgaon sheri vidhan sabha election 2024
पुणे: अटीतटीच्या सामन्यात ‘मैत्री’ निर्णायक? ‘या’ मतदार संघात आहे असे चित्र!
nagpur Congress party leader is campaigning for Congress rebel Rajendra Mulak
रामटेकमध्ये काँग्रेसचा ‘मविआ’विरोधातच प्रचार? शिवसेनेचा आरोप
maaharashtra assembly election 2024 open support to opposition against party candidate in kolhapur vidhan sabha constituency
कोल्हापूरमध्ये पक्षाच्या उमेदवाराविरोधात विरोधकांना उघड मदत
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

हेही वाचा…आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा, अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा

या वेळेला घाटगे यांनी त्यांचा कारखाना उभारण्यास मदत केल्याची परतफेड म्हणून आपली ताकद मुश्रीफ यांच्या पाठीशी उभी केल्याने त्यांचे बळ वाढले आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार असल्याने घाटगे हे आघाडीधर्माचे पालन करीत महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचारात दिसायला हवेत. पण ते सध्या मैत्रीधर्म निभावत मुश्रीफ यांच्या प्रचारात धडाडीने उतरले आहेत. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा झाला. त्यांनी आघाडी धर्माचे पालन केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पण आपलेच काही पदाधिकारी विरोधकांना मदत करत असताना यावर त्यांनी मौन पाळले.

हेही वाचा…लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

पन्हाळा मतदारसंघांमध्ये जनसुराज्य शक्तीचे संस्थापक आमदार विनय कोरे यांच्याशी उद्धव ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर हा पारंपरिक सामना होत आहे. येथे काँग्रेसशी संबंधित करण गायकवाड, अमर पाटील हे प्रमुख युवा नेते उघडपणे महायुतीच्या प्रचारात उतरले आहेत. इचलकरंजी मतदारसंघात भाजपचे राहुल आवाडे व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे यांच्यात लढत होत आहे. भाजपचे माजी उपनगराध्यक्ष अजित जाधव, माजी नगरसेवक प्रमोद पाटील हे तुतारीच्या प्रचारात उतरले आहेत. शिरोळ मध्ये आमदार राजेंद्र पाटील आणि गणपतराव पाटील यांच्यात रंगतदार सामना होत आहे. येथे भाजपशी संबंधित यादव काका पुतणे कॉंग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांना साथ देत आहेत. अन्य मतदारसंघांमध्येही काही कार्यकर्ते असेच विरोधी गटाची तळी उचलताना दिसत असले तरी याबाबत सध्या तरी कारवाई ऐवजी सारे आलबेल दिसत असल्याने राजकारणातील निष्ठेची चर्चा होत आहे.