कोल्हापूर : लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार जागांवर सोमवारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. यामुळे जागावाटपाच्या चर्चेला तोंड फुटले आहे. कोल्हापूर जिल्हा ग्रामीण आणि कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवाजी स्टेडियम येथील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचा २६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक व स्वागत शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी केले. यावेळी ८ खासदारांचे अभिनंदन करण्याबरोबरच पक्षाध्यक्ष शरदचंद्रजी पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही संघटन कौशल्याबद्दल आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेचे आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आता विधानसभेचे वेध लागले असून कोल्हापूर जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीकडे असून या तीनही मतदारसंघांमध्ये शरदचंद्र पवार जो उमेदवार देतील तो निवडून आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले. कागल, चंदगड आणि राधानगरी-भुदरगड हे तिन्ही मतदारसंघ पारंपारिक २५ वर्षांपासून राष्ट्रवादीकडे आहेतच. उरलेल्या सात मतदारसंघापैकी दोन मतदारसंघ हे राष्ट्रवादीला मिळावेत अशी मागणी आहे. परंतु चौथा मतदारसंघ देखील निश्चितपणाने आपल्या पक्षाचाच असेल आणि तो कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी, शिरोळ, हातकंणगले या ५ विधानसभा मतदार संघापैकी एकतर नक्की असेल आणि तो पूर्ण ताकदीनिशी लढवून पक्षाची तुतारी वाजवणारच अशा ठाम निश्चय यावेळी करण्यात आला. त्यासाठी चौथ्या मतदारसंघाबाबत लवकरच पवार साहेबांच्या बरोबर चर्चा करून जाहीर केला जाईल.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…

हेही वाचा : स्मार्ट प्रिपेड मीटर सामान्यांची लूट करण्यासाठी; कोल्हापुरात ‘आप’चा आरोप

महाविकास आघाडी म्हणून कोल्हापुरातील सर्वच पक्षांनी मिळून छत्रपती शाहू महाराज साहेब यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे मी आभार मानतो त्याचबरोबर आयत्या वेळेला महाविकास आघाडीने सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी दिली आणि वीस दिवसांत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आणि अगदी थोडक्या मतांनी पराभव पत्करावा लागला परंतु हा विजय महायुतीचा नसून हा पैशाचा आहे असे व्ही. बी. पाटील म्हणाले राजू शेट्टीने ऐकलं असतं तर कोल्हापूर जिल्ह्याच्या ठरल्याप्रमाणे दोन्ही जागा महाविकास आघाडीला मिळाल्या असत्या असे सांगितले. आजच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांनाच शुभेच्छा, लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील बाराही तालुक्यांचा दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येईल असे जाहीर केले. आज तालुका पातळीवर देखील राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्या सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनापासून शुभेच्छा यावेळी आभार प्रदर्शन महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले यांनी मांडले. सूत्रसंचालन सेवा दलाचे शहराध्यक्ष महादेव पाटील यांनी केले.

हेही वाचा : ठरलं तर! करवीर मधून राहुल पाटील लढणार; पी. एन. पाटील यांचा विधानसभेचा वारसदार निश्चित

यावेळी कार्याध्यक्ष अनिल घाटगे, जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी माने मांगुरकर, सरचिटणीस सुनील देसाई, माजी सरचिटणीस चंद्रकांत वाकळे, रामराजे कुपेकर, करवीर तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, निरंजन कदम हिदायत, मणेर मुसाबाई कुलकर्णी, रियाज कागदी, गणेश जाधव, अरुणा पाटील, रामराजे पदाले, गणेश नलवडे जाधव, अरुणा पोळ, महेश कांजर, सुवर्णा शिंदे, राजाराम मटकर, राजेंद्र पाटील, नितीन मस्के, नागेश शिंदे, राजेंद्र ओंकार, लहू शिंदे, प्रशांत पाटील सोहेल बागवान, सदानंद कवडे, सुरेश कुरणे, सलीम मुल्ला, राजाराम सुतार, राजू जमादार, राजू मालिकोर, नागेश जाधव, नागेश फरांडे, संदीप साळुंखे जाधव, अनिल डांगे, निकिता माने, दिनकर धोंगडे, रियाज पावती ,चंद्रकांत सूर्यवंशी, छाया नलवडे, मंगल कट्टी, सुमन वाडेकर, पुंडलिक माने, मुकुंद दळवी, कैलास शिंदे, कर शशिकांत कदम, संजय शिंदे, भुदरगड अध्यक्ष धनराज चव्हाण, मोहन कांबळे इत्यादी सह तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.