कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेलेली आहे. निकाल जवळ येईल तसा महायुती तसेच महाविकास आघाडीकडून आपलाच उमेदवार विजयी होणार असा दावा तावातावाने केला जात आहे. प्रमुख उमेदवारांनी विजयाची खात्री व्यक्त केली आहे.

मतमोजणीच्या पूर्वसध्येला कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांचे विजयाचे फलक झळकावण्यात आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगलेमधून ५० हजाराच्या मताधिक्याने विजयी होऊ असा दावा केला आहे. महायुतीचे संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोन्ही खासदारांना पुन्हा संसदेत जाण्याचा विश्वास आहे. हातकणंगलेत सत्यजित पाटील सरूडकर हे विधानसभेनंतर आता लोकसभेत जाऊ अशी खात्री व्यक्त करत आहेत.

हेही वाचा – रायगडावरील शिवराज्याभिषेकाची जय्यत तयारी; संयोगिता राजे छत्रपतींनी घेतला आढावा

हेही वाचा – कोल्हापुरात ११ वाजता कल निश्चित होणार; मतमोजणी यंत्रणा सज्ज

राजतिलक तयारी

इचलकरंजीत आमदार प्रकाश आवाडे यांनी ‘राजतिलक कि करो तयारी नरेंद्र मोदी सबसे भारी’ अशा आशयाची हजारो पत्रके घरोघरी वाटली असून विजयोत्सवाची तयारी केली आहे. अनेकांनी आजच गुलाल- फटाक्याची मोठी खरेदी केली आहे.

Story img Loader