कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जीवनदायिनी ठरलेल्या काळम्मावाडी योजनेला बुधवारी पुन्हा एकदा गळती लागली. तुरुंबे ते कपिलेश्वर या रस्त्यावर गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात गळतीचा उपद्रव झाला होता. कोल्हापूर शहराच्या शुद्ध व मुबलक पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी काळम्मावाडी धरणातून नळ पाणी योजना राबविण्यात आली. या योजनेला गळतीचे प्रकार घडू लागले आहेत. नोव्हेंबरच्या मध्यास हळदी ते कुर्डू या गावच्या दरम्यान जलवाहिनीला गळती लागली होती. चार ठिकाणी एअर व्हॉल्वला लावलेले नट बोल्ट काढले होते. यामुळे पाण्याचे फवारे ५० ते ६० फूट उंच उडत होते. मोठ्या प्रयत्नानंतर ही गळती थांबवण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : कोकणातील जलविद्युत प्रकल्पाला पाणी देण्यास कोल्हापुरातील सर्वपक्षीयांचा विरोध

दरम्यान आज पुन्हा या जलवाहिनीला गळती लागल्याचा प्रकार निदर्शनास आला. तुरुंबे ते कपिलेश्वर या रस्त्यावर गळती दिसून आली. शेतालगत पाणी वाहून जात होते. आजूबाजूच्या शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोल्हापूर महापालिकेच्य पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी गळती थांबवण्याचे काम गतीने सुरू केले होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur pipeline leakages of kalammawadi water supply scheme damaged farms css