कोल्हापूर : प्रदुषण मंडळाकडुन इचलकरंजीतील सायझिंग उद्योग बंद पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप इचलकरंजी येथे मंगळवारी झालेल्या सायझिंगधारकांच्या बैठकीत करण्यात आला. तसंच दररोज सुमारे साडेआठ कोटी लिटर पाण्याचा विसर्ग करणार्‍या जिल्ह्यातील घटकांवर प्रदुषण मंडळ कोणतीच कारवाई करत नाही. मात्र ५०० लिटरपर्यंत विसर्ग करणारे कारखाने बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. लाखो लिटर विसर्ग होणार्‍या पाण्याकडं दुर्लक्ष होण्यामागं गौडबंगाल काय ? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इचलकरंजीतील सायझिंगमधून बाहेर पहणार्‍या पाण्यामुळं प्रदुषण होत असल्यानं प्रदुषण नियंत्रण मंडळ सायझिंगवर कारवाई करते. त्यामुळं इचलकरंजी सायझिंग असोसिएशननं १ फेबु्रवारी २०२१ ला प्रदुषण नियंत्रण मंडळाकडं स्लज उचलण्यासाठी लेखी परवानगी मागणी केली असून काही सायझिंगधारकांनी परवान्याची मुदत संपल्यानं नुतनीकरणासाठीही अर्ज केला आहे. जिल्हाधिकार्‍याच्या सुचनेनुसार सध्या स्लज उचलला जात असला तरी बायोडायजेस्टर बसवणे, स्लज ड्राईंग बेड तयार करणे आणि जागेमध्ये गुंतवणुक करण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळानं लेखी परवानगी देणं आवश्यक आहे. मात्र ३ वर्षेे झाली तरी परवानगी दिली नाही. या प्रकल्पासाठी सुमारे बारा कोटी रुपये गुंतवणुक करावी लागणार असून हा प्रकल्प तीन महिन्यात पुर्ण होणं अशक्य आहे. तरीही प्रकल्पासाठी मुदतवाढही देत नाही. प्रकल्प पूर्ण करा अन्यथा सायझिंग उद्योगांना क्लोजर नोटीस पाठवण्याची धमकी दिली जात आहे.

हेही वाचा : शिरोळच्या दत्त शैक्षणिक संकुलाची श्रेणीवाढ; आता अभियांत्रिकी पदवी शिक्षणाची सोय – गणपतराव पाटील

या पार्श्‍वभूमीवर सायझिंगधारकांनी बैठक घेतली. यावेळी बायोडायजेस्टरसाठी इचलकरंजी महापालिका, प्रदुषण मंडळ, जिल्हाधिकार्‍यांकडं प्रदुषण नियंत्रण प्रक्रियेसाठी राखीव ठेवलेली जागा अनेकवेळा मागणी करूनही मिळत नाही. आणि बायोडायजेस्टर बसवण्यासाठी नोटीस पाठवुन सायझिंग उद्योगांना प्रदुषण मंडळाचे अधिकारी हैराण करत आहेत. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने तीन महिन्यापूर्वी जागा विकत घेवून बायोडायजेस्टर बसवण्यासंदर्भात असोसिएशला सुचना केली होती. मात्र त्यासाठी लागणारी जागा आणि खर्च पाहता स्लज उचलण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी मिळणे आवश्यक आहे. मात्र परवानगीही मिळत नसल्यानं सायझिंगधारक गुंतवणूक करण्यास तयार नाहीत. स्लज उचलण्यासाठी मागणी करून तीन वर्षे झाली तरी परवानगी मिळाली नाही. उलट प्रदुषण मंडळ सायझिंग असोसिएशन, सायझिंगधारकांनाच दोषी ठरवत आहेत. त्यामुळं सायझिंगधारकांनी प्रदुषण मंडळाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली असता सायझिंगमधून ५०० लिटर पाणी विसर्ग होत असताना बायोडायजेस्टर बसवण्यासाठी तगादा लावला आहे पण दररोज लाखो लिटर प्रदुषित पाणी बाहेर पडत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं निदर्शनास आलं.

हेही वाचा : साखर उद्योगातील संशोधने कपाटात नकोत, वापरात यावीत – प्रकाश आवाडे

मालेगांव, भिंवडी इथं इचलकरंजीच्या दुप्पट, तिप्पट सायझिंग असुनही त्या ठिकाणी प्राथमिक ट्रिटमेंट प्लॅन्ट बसवलेले नाहीत. त्या ठिकाणी एकत्रित प्लॅन्ट बसवण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळ आग्रह करत नाही किंवा त्याठिकाणच्या वस्त्रोद्योगावार कारवाईही करत नाही. यावरुन प्रदुषण मंडळाला जाणीवपूर्वक इचलकरंजीतील सायझिंग उद्योग बंद पाडायचा आहे काय ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. प्रदुषण मंडळानं बेकायदेशीरपणे सायझिंग उद्योग बंद करणेची नोटीस दिल्यास सायझिंग उद्योग पुन्हा बंद ठेवण्याची तयारीही सर्व सायझिंगधारकांनी दर्शविली. प्रदुषण मंडळाच्या सुचनेनुसार प्राथमिक स्वरुपाचा ट्रीटमेंट प्लॅन्ट बसवला असून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन केलं आहे. पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त होण्यासाठी सायझिंगधारक आवश्यक ते सहकार्य करत आहेत. मात्र प्रदुषण मंडळ बायोडायजेस्टरसाठी जागा उपलब्ध करुन देत नसेल, स्लज उचलण्याची परवानगी देत नसेल, बायोडायजेस्टर यंत्रणेसाठी नियम, अटी देत नसेल तर पर्यायी व्यवस्था सुचवण्याची मागणीही यावेळी सायझिंगधारकांनी केली. तसंच सायझिंगमधून पाणी विसर्ग होवू नये याचा विचार करुन सायझिंगधारक नविन विकसीत केलेली ट्रिटमेंट प्लॅन्ट लवकरच कार्यान्वित करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur pollution control board try to shut sizing businesses allegations by sizing holders in meeting css
Show comments