कोल्हापूर : हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती देणाऱ्या फलकावरील क्यूआर कोड मध्ये मूळ माहिती ऐवजी कुटचलनासंदर्भातील (बिटकॉइन) संकेतस्थळ दिसत आहे. तो पाहणाऱ्यांच्या गोंधळ उडत आहे. यामुळे या प्रकाराची चर्चा होत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी खासदार माने यांनी सुरू केली आहे. त्यासाठी मतदारसंघात विविध ठिकाणी मोठमोठे फलक उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये ८२०० कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा दावा आहे. तर त्याचा तपशील मिळण्यासाठी क्यूआर कोड या नव्या तंत्राचा वापर केला आहे.
हेही वाचा…राजू शेट्टी महाविकास आघाडीबरोबर ?
तथापि हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्यावर कुटचलन तसेच विविध शेअर मार्केटचे संकेतस्थळ दिसत आहे.भलतीच माहिती समोर येत असल्याने अनेकांचा गोंधळ उडत आहे. चुकीचा पद्धतीचा क्यूआर कोड नोंदला गेला असल्याने समाज माध्यमात माने यांना टीकेचे लक्ष्य केले जात असूनही तपशील दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.