कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असल्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा तोल सुटला आहे. त्यांच्या तोंडातून गटारगंगा वाहू लागली आहे. त्यांना माहित असावे की, खासदार संजय मंडलिक स्वतःच्याच घरात झोपतात. कधी कुणा नटीच्या नादाला लागलेले नाहीत. म्हणून त्यांचा संसार टिकून आहे, अशी बोचरी टीका एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केली आहे.

चंदगड येथील महायुतीच्या मेळाव्यात जमादार बोलत होते. जिल्हा उपसंघटक डॉ. नामदेव निट्टुरकर व उपतालुकाप्रमुख सुजाता कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. जमादार म्हणाले,”काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचार सभांत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी प्रचाराची पातळी सोडली आहे. काँग्रेस उमेदवाराचा पराभव नजरेपुढे दिसू लागल्याने ते सैरभैर झाले आहेत.

Sumit Wankhede Arvi Constituency, Sumit Wankhede,
भाग्य फळफळले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन सचिवही निवडणुकीच्या रिंगणात
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Mahayuti Bhandara, Narendra Bhondekar,
भंडाऱ्यात महायुतीतील नाराजीच्या ठिणगीचे वणव्यात रुपांतर! नरेंद्र भोंडेकर यांच्याविरोधात इच्छुकांची अपक्ष लढण्याची तयारी
thackeray group nominated Kedar Dighe against CM Eknath Shinde in Kopri Pachapkhadi
मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे, ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर
Nana Patole, rebellion in Congress, Nana Patole news,
नाना पटोलेंच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरीचे वारे, नेमके कारण काय?
mla santosh bangar get election commission notice over phone pe statement
बांगर यांना निवडणूक विभागाची नोटीस; ‘फोनपे’वरील विधानावरील वाद
Threat to Parliamentary Committee Chairman for Waqf Bill
वक्फ विधेयकासाठी संसदीय समिती अध्यक्षांना धमकी; खासदार तेजस्वी सूर्या यांचे ओम बिर्ला यांना पत्र
Navneet Rana, Rajya Sabha, Navneet Rana Rajya Sabha,
माजी खासदार नवनीत राणा राज्‍यसभेवर जाणार?

हेही वाचा…कोल्हापूर, इचलकरंजीत दमदार पाऊस; झाड कोसळल्याने दुचाकीस्वार जखमी

त्यातूनच संजय मंडलिक यांच्यावर पातळी सोडून टीका करू लागले आहेत. आता त्यांच्या झोपण्यावरही टिका सुरू आहे, याकडे लक्ष वेधत राजेखान जमादार म्हणाले, आमचे खासदार स्वतःच्याच घरात झोपतात. कधी कुणा नटीच्या नादाला लागलेले नाहीत. म्हणून त्यांचा संसार टिकून राहिलेला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

अनेक निवडणुकात खासदार संजय मंडलिक यांचा पाठिंबा सतेज पाटील घेतला. त्यामुळे त्यांना विविध संस्थात यश मिळाले आहे. यशाचे सगळे श्रेय लाटण्यात सतेज पाटील माहीर आहेत. मंडलिकांचा पाठिंबा घेवून मिळालेल्या विजयाचा गुलाल आपल्या अंगावर टाकून घेण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. अनेक निवडणूकातील विजयात संजय मंडलिक यांचा खारीचा वाटा आहे. एवढीही कृतज्ञता सतेज पाटील यांच्याकडे नाही.

हेही वाचा…कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण

जिल्हाध्यक्ष जमादार म्हणाले, गृहराज्यमंत्री असताना २०१४ साली विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणूकीत अमल महाडीक यांच्या सारख्या नवख्या उमेदवाराने त्यांना पराभव केला. त्यानंतर ते इतके कपटीकारस्थान, पाताळयंत्री , मायावी बोलणारे आणि विश्वासघातकी झाले आहेत की, जनतेतून निवडणूक लढवण्याचे धाडस त्यांच्यात उरलेले नाही. म्हणून पाठीमागच्या दाराने विधान परिषदेवर निवडून गेले.

महाराजांच्या राजकिय बळीचे पातक

काँग्रेस हाय कमांडने कोल्हापूरची उमेदवारी सतेज पाटील यांनाच दिली होती. आपण जनतेतून निवडून येणार नाही हे पक्के माहित असलेल्या सतेज पाटलांनी उमेदवारीची माळ ७७ वर्षाच्या शाहू महाराजांच्या गळ्यात घालून महाराजांचा राजकीय बळी देण्याचे पातक केले आहे,अशी टीका राजेखान जमादार यांनी केली.

हेही वाचा…कोल्हापुरात ‘एमआयएम’चा पाठिंबा घेण्यामागे कोणते षडयंत्र दडले आहे; हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सवाल

यावेळी यशोवर्धन मंडलिक, उपजिल्हा प्रमुख बाबू नेसरकर,युवा सेना तालुका प्रमुख गजानन गावडे , वाहतूक सेना तालुका प्रमुख सलीम मुल्ला,शिव उद्योग सेना तालुका प्रमुख सुशांत नौकुडकर, शिवसेना चंदगड तालुका सचिव अविनाश पाटील,उपतालुकाप्रमुख नामदेव सावंत, युवा सेना उपतालुकाप्रमुख कैलास बोकडे,मनोहर पाटील, विभाग प्रमुख अनिल गावडे, केदारी निवगीरे, यल्लापा पाटील, संभाजी पाटील,बाळू कडोलकर,पप्पु गावडे, श्रीकांत सुभेदार उपस्थित होते.