कोल्हापूर : भाजपला निवडणूक सुखकर होऊ नये या हेतूने दोन वेळा उद्धव ठाकरे यांना भेटलो. सुरुवातीला त्यांनी अनुकूलता दाखवली पण कुठून काय चाव्या फिरल्या माहित नाही. दोन्ही आघाड्यामधील साखर कारखानदार एकत्र येऊन हे कारस्थान करत आहेत, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी व्यक्त केले. तरीही त्यांना आम्ही मैदानात लोळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाकरे गटाने सत्यजित पाटील यांना हातकणंगलेतून उमेदवारी जाहीर केल्याने शेट्टी यांना मोठा धक्का मानला जात असून चौरंगी लढत होणार आहे. या विषयावर शेट्टी पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा : महाविकास आघाडीच्या ताकदीवर निवडून येणार; सत्यजित पाटील सरूडकर यांना विश्वास
खुशाल जातीचे कार्ड घ्या!
ते म्हणाले, किती रंगी लोकसभा निवडणूक लढत झाली तरी त्याची पर्वा नाही. बहुरंगी लढतीची मी तयारी करत चाललो आहे. मत विभागणीची चिंता इतरांनी करावी. वंचित बहुजन आघाडीने जैन समाजाचा उमेदवार दिला असल्याबाबत शेट्टी यांनी अजून कोणीही जातीचे कार्ड घेऊन निवडणुकीत खुशाल उतरू शकतात. कोल्हापूर हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे.
हेही वाचा : अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
लोक का अडवतात ?
खासदार धैर्यशील माने यांनी अति शहाणा त्याचा बैल रिकामा अशा शब्दात केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना शेट्टी म्हणाले,माझे केस पांढरे झाले ते चळवळीतून. मला सल्ला देण्यापेक्षा मतदार संघात जाईल तेथे लोक का अडवत आहेत आणि मित्र पक्षाचे लोक तुम्हाला जवळ करत नाहीत ते पाहावे. मतदार संघात माझी एक फेरी पूर्ण झाली आहे. यांचे दिवस अजून आपल्याच लोकांची समजूत काढण्यात चालले आहेत,असा टोला लगावला.