कोल्हापूर : सत्ता वंगाळ असते. माझे मंत्री पद गेले. तसे गाड्या, गाडीवालाही गेला आणि उरलो केवळ मी एकटाच! अशा शब्दांत माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सत्ता असताना आणि नसतानाचे विदारक चित्र मांडत मनीचे शल्य व्यक्त केले. हातकणंगलेतील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या एका प्रचार सभेमध्ये सदाभाऊ खोत यांनी सत्तासुंदरीचे कटू वास्तव मिश्किल पण तितक्याच मनाला भिडणाऱ्या रांगड्या शैलीत मांडले.

खरं वजन कळलं

ते म्हणाले, सत्ता, मंत्री असताना काय रुबाब असायचा. कोणत्याही तालुक्यात गेलो की एक किलोमीटर लांबीची मोटारींची रांग लागलेली असायची. मला वाटायचं आपलं वजन चांगलंच वाढलं आहे ते किती वाढलंय हे मंत्रिपद गेल्यावर कळलं. मंत्री असताना रात्री एक वाजले तरी लोकांचे फोन यायचे, मी ते घ्यायचो. आता मी दिवसा फोन केला तरी उचलला जात नाही.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”

हेही वाचा : छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका

गडी फिरकेना कि

आमचे सरकार गेले आणि दुसरे आले. तेव्हा मुंबईहून घरी परतलो. नेहमीप्रमाणे जनता दरबारासाठी खुर्चीवर बसलो घराकडे येणाऱ्या गाड्यांचा प्रकाशझोत दिसला कि वाटायचे गडी माझ्याकडे आला आहे. पण एकानेही गाडीची काच खाली केली नाही, असे वास्तव त्यांनी अधोरेखित केले.

आमदारांचे दुःख!

सत्ता आली की सगळेजण पळत येतात हेच खरे. हा संदर्भ सांगताना त्यांनी त्यामध्ये भाजपचे माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनाही ओढून त्यांचेही दुःख कथन केले. ते म्हणाले, तर सुरेश हाळवणकर आमदार असताना त्यांच्याकडे मोठा दरबार भरलेला असायचा. त्यांना संपर्क केला की म्हणायचे, भाऊ कामाचा उरकच होत नाही. आता त्यांना विचारले की म्हणत असतात फेरफटका मारतोय. त्यांच्यासोबत हिंदुराव शेळके उरले आहेत.

हेही वाचा : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त

ओळखही दाखवत नाहीत

सत्ता असताना मी पोरांना, माझ्या पोरांना म्हणायचो, अरे! लोक रात्री – अपरात्री आपल्या घरी आलेत. त्यांना भेटा. त्यांच्या अडचणी समजून घ्या. इतकेच काय मी मंत्री असताना माझ्याकडे अनेक जण यायचे. त्यांना चांगले खाऊ घालायचो. त्याचा आस्वाद घेत ते म्हणायचे इतके मंत्री पाहिले पण भाऊ तुमच्यासारखा मंत्री पहिला नाही. तुमच्यासारखा माणूस नाही. आता मात्र यातील अनेक जण ओळख दाखवण्याचे टाळतात, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी आपले दुःख वेशीवर टांगले.

हेही वाचा : कोल्हापूरात पर्यावरण रक्षणासाठी सायकलवरून येऊन संदीप संकपाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बोलायचे तर दाबून

राजकारण करत असताना दाबून बोलावे लागते. कधी खरे. कधी खोटे, अशा शब्ता कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीचेच घ्या ना. मी सारखा म्हणत होतो हातकणंगले मधून मी लढणारच. लढणार नाही असे म्हणालो असतो तर लोक माझ्यासोबत राहिले असते का? ते म्हणाले असते, गडी मागे सरला. आता मी म्हणतो मंत्रीपद मिळणार आहे. ते विचारतात, खरेच का? मग मी त्यांना म्हणतो, लागा कामाला!