कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी दीड लाखावर मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचे दुसऱ्यांदा संसदेत जाण्याचे स्वप्न खंडित केले. शाहू महाराजांच्या रूपाने संसदेमध्ये छत्रपती घराण्यातील कोल्हापूर छत्रपती घराण्यातील छत्रपती घराण्याला दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यांच्या विजयानंतर मतदार संघात गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि शिंदे सेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये लढत होती. खासदार संजय मंडलिक यांचा मतदारसंघाची संपर्क नसल्याने त्यावरून नाराजी व्यक्त केली जात होती. भाजपने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ते पिछाडीवर असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे उमेदवारी बदलली जावी अशी ही मागणी होत होती. तथापि मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र कोल्हापूर मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेऊन संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेस पक्षाने ऐनवेळी श्रीमंत शाहू महाराज यांना रिंगणात उतरवले. काँग्रेसची ही खेळी यशस्वी झाल्याचे निकालावरून दिसत आहे.

हेही वाचा…Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : हातकणंगलेत उत्कंठावर्धक मतमोजणीत धैर्यशील माने यांची बाजी

आज येथील रमण मळा भागातील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्याच फेरीपासून शाहू महाराज यांनी मताधिक्य घेण्यास सुरुवात केली. ते अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिले. पहिल्याच फेरीत शाहू महाराज यांना २९ हजार ६५४ तर संजय मंडलिक यांना २३३१३ इतके मते होतील. पहिल्या फेरीत ७ हजाराहून अधिक मताधिक्य मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर आनंद दिसू लागला.
तर सहाव्या फेरी वेळी शाहू महाराजांना २९ हजार ६२३ तर मंडलिक यांना २३७५२ इतके मते होती.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सोळाव्या फेरीचे आकडे उपलब्ध झाले. या फेरीपर्यंत शाहू महाराजांना ४०८१० तर मंडलिक यांना ३८७४९ इतके मते मिळाली होती. शाहू महाराज यांनी ९७२६१ मतांची आघाडी घेतली होती. तर पुढच्या फेरीत त्यांनी मताधिक्यात लाखाचा आकडा ओलांडला.

हेही वाचा…कोल्हापुरात कार्यकर्ते गुलाल उधळण्यास आतुर; शाहू महाराजांचे पोस्टर झळकले, महायुतीची राजतिलकाची तयारी

दरम्यान, दुपारपासूनच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नवीन राजवाडा येथे जमू लागले. फटाक्याची आतषबाजी ,गुलालाची उधळण करण्यात आली. श्रीमंत शाहू महाराज यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी रीघ लागली होती.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur shahu maharaj won by one and a half lakh votes sanjay mandalik lost psg
Show comments