कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शैक्षणिक संकुलाची श्रेणी वाढ झाली आहे. पदविका अभियांत्रिकेचे शिक्षण असणाऱ्या या शिक्षण संस्थेत आता अभियांत्रिकी पदवीची (डिग्री) मान्यता मिळाली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत केले. या अभियांत्रिकी संकुलास डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील इनस्टीट्यूट ऑफ टेकनॉलॉजी या नावाने संबोधले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, स्वर्गीय डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, उच्च शिक्षणाचा लाभ व्हावा व अत्यल्प फी मध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे, या भावनेतून श्री दत्त चारिटेबल ट्रस्ट अंतर्गत, कारखान्याच्या परिसरात पॉलिटेक्निक कॉलेज सन २०१० पासून सुरू करण्यात आले आहे. या कॉलेजच्या माध्यमातून अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या बरोबरच परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी प्राप्त झाली आहे.
हेही वाचा : साखर उद्योगातील संशोधने कपाटात नकोत, वापरात यावीत – प्रकाश आवाडे
या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा लाभ व्हावा याकरीता इंजीनियरिंग कॉलेजची शासन स्तरावर मान्यता मिळावी याकरता गेल्या काही वर्षापासून प्रयत्न सुरू होते. शासनाने इंजिनिअरिंग कॉलेजला मान्यता दिली असून शैक्षणिक वर्ष चालू वर्षापासून डिग्री कोर्स सुरू करण्यात येत आहेत चार ट्रेडला मान्यता मिळाले असून २४० विद्यार्थ्यांना या ट्रेडच्या माध्यमातून बी. टेकचे डिग्री प्राप्त होणार आहे. यावेळी संस्थेचे प्राचार्य पी आर पाटील यांनी नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधाची माहिती यावेळी दिली याप्रसंगी एम. व्ही. पाटील दत्त कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील ए एम नानवडेकर सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
हेही वाचा : कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग रुग्णांना मिळणार हृदयाच्या अत्याधुनिक उपचाराची मोफत सुविधा
आप्पासाहेबांच्या विचारांची पुनरावृत्ती
स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील हे कारखाना लाभ क्षेत्रातील गावांमध्ये फिरत असताना ,अनेक सभासदाकडून पॉलिटेक्निक कॉलेजची उभारणी करावी अशी मागणी करीत होते. या पार्श्वभूमीवर सभासदांच्या मालकीचे पॉलीटेक्निक कॉलेज स्वर्गीय सा.रे. पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर उभा केले. डिग्री कॉलेजची मागणी ही दत्त कारखान्याचे सभासद व लाभ क्षेत्रातील नागरिक करीत होते. या मागणीचा विचार करून गणपतराव पाटील यांनी डिग्री कॉलेजला मंजुरी आणून परिसरातील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक दालनाची सोय केल्याबद्दल सोय केल्याने, साऱ्यांच्या विचारांची पुनरावृत्ती गणपतराव पाटील यांनी केली आहे.