कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील अवैध खनिज उत्खनन कायमस्वरूपी बंद करण्यात यावे यास अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलकांनी प्रांत कार्यालय परिसरात ठिय्या मारला. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडहिंग्लज तालुका हा निसर्ग संपन्न आहे. येथे अवैध खनिज उत्खनन केल्याने पर्यावरणावर घाला पडत आहे. त्यामुळे तो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी आज ठाकरेसेनेने गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

हेही वाचा : राज्यातील ८३०५, कोल्हापुरातील २७१ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; पावसाचा परिणाम

मोर्चामध्ये जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांनी प्रांत कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामध्ये महिला लक्षणीय उपस्थित होत्या. आंदोलकांच्या हाती विविध मागण्यांचे फलक होते.