कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सन्मान मिळत नसल्याने प्रचार थांबविण्यात यावा, शिवसैनिकांनी प्रचार थांबावावा , अशा आशयाचा एक संदेश समाज माध्यमात अग्रेषित झाला. यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, प्रचार थांबवावा असे कोणत्याही प्रकारचे आदेश वरून आलेले नाहीत. प्रचार सुरूच आहे, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे उपनेते, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे उमेदवार असलेले शाहू महाराज यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दोन दिवसांपूर्वी शिवाजी स्टेडियम येथे झाले होते. यावेळी महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते.

Mashal Yatra of Thackeray group starts from buldhana
१७ दिवसांत १५१ गावांतून प्रवास; ठाकरे गटाच्या मशाल यात्रेला बुलढाण्यातून प्रारंभ
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Mahavikas Aghadi protest in response to the collapse of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Malvan case print politics news
भाजपचे ‘खेटरे मारा’ आंदोलनाने उत्तर; पक्षाचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग
Opposition leader Vijay Wadettiwar criticism of the Sanjay Rathod plot case Nagpur news
मतांसाठी लाडक्या बहिणीला १५०० रुपये आणि लाडक्या मंत्र्याला ५०० कोटींचा भूखंड; संजय राठोड भूखंड प्रकरण
live worms found in chocolate distributed to students in rajura taluka
चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या, सोंडे; ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती’अंतर्गत विद्यार्थांना वाटप
Samarjitsinh Ghatge signaled a change in political direction for development in Kagal constituency  Print politics news
समरजितसिंह घाटगे ‘तुतारी’ फुंकणार
Ragini Nayak, Congress Spokesperson Ragini Nayak, ragini nayak critices mohan bhagwat, Mohan Bhagwat, Narendra Modi, anti women, Badlapur incident
‘संघप्रमुखांना केवळ विजयादशमीला ‘नारी-शक्ती’ आठवते, मोदींचे मौनही संतापजनक…’ काँग्रेसच्या प्रवक्त्याने……
mahayuti, Abdul Sattar, Dhananjay Munde, Radhakrishna Vikhe Patil, state level events, agriculture festival, political power
माझा मतदारसंघ, ‘राज्यस्तरीय’ कार्यक्रमांची माझीच जबाबदारी, विविध महोत्सवांचा मंत्र्यांकडून पायंडा

हेही वाचा : हातकणंगलेत मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल; ‘मातोश्री’चा स्पष्ट निर्णय

झेंड्याचा वाद

मात्र, शिवसेनेचे भगवे झेंडे कमी प्रमाणात होते. यावरून शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. नाराज झालेल्या शिवसैनिकांची तेथेच मनधरणी करण्यात आली होती. तथापि काही शिवसैनिकांची नाराजी दूर झाली नाही.

संदेशाने उडाली खळबळ

यातूनच कोल्हापुरात प्रचार थांबविण्यात येत आहे, अशा आशयाचा एक संदेश समाज माध्यमात देण्यात आला. तो झपाट्याने सगळीकडे पसरला. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा : हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी इच्छूकांची ‘मातोश्री’वर धाव

गैरसमज नसावा – जिल्हाप्रमुख

याबाबत विचारणा केली असता शिवसेनेचे उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, आज आम्ही शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कोकणात विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आलेलो आहोत. कोल्हापूरमध्ये प्रचार थांबावा अशा प्रकारचा मेसेज आल्याचे समजले आहे. मात्र हा प्रकार शिवसैनिकांच्या नाराजीतून झाल्या असल्याचे दिसते. प्रचार थांबविण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून अद्याप मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये, असे पवार यांनी सांगितले.