कोल्हापूर : राज्यातील दीड लाखावर साखर कामगारांचा पंचवार्षिक वेतन करार लांबून सात महिने उलटले, तरीही त्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू नसल्याने ऐन दिवाळीत साखर कामगारांची तोंडे कडू झाली असून, याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या दोन्ही प्रमुख कामगार संघटनांनी १६ डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा साखर आयुक्तांना दिला आहे. एकीकडे विधानसभा निवडणूक, त्यासाठी गावीच अडकून राहिलेला ऊसतोड कामगार, लढतीत गुंतलेले साखर कारखानदार, लांबलेला पाऊस यामुळे यंदाचा साखर हंगाम लांबणीवर जात असताना साखर कामगारांनी काम बंदचा इशारा दिल्याने निवडणुकीनंतर साखर कारखानदारांवर तोंडे कडू होण्याची वेळ येईल, असे दिसत आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील अर्थकारणाला दिशा देणारा उद्योग म्हणून साखर कारखानदारीकडे पाहिले जाते. या उद्योगाचा डोलारा दीड लाख कामगारांच्या श्रमावर अवलंबून आहे. त्यांना दर पाच वर्षांनी पगारवाढ दिली जाते. या आधीच्या पगारवाढीची मुदत ही यंदाच्या मार्च महिन्यात संपली. त्यास सात महिने उलटून गेले.

National Sugar Factory Federation made various demands to the Central government
साखर उद्योग आर्थिक संकटात ? राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केंद्राकडे केल्या विविध मागण्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
belgaon black day marathi news
सीमा भागात काळा दिन; बेळगावात फेरीला प्रतिसाद

हेही वाचा :जयश्री जाधव यांचे काँग्रेस सोडणे अशोभनीय – सतेज पाटील

घोडे अडले

पंचवार्षिक पगारवाढ व्हावी यासाठी साखर कामगार, साखर कारखानदार व शासन यांचे प्रतिनिधी असलेली त्रिस्तरीय समिती असते. समिती नियुक्त करावी यासाठी कामगार मंत्री सुरेश खाडे यांना दोन वेळा भेटलो, पण त्यांनी हा विषय आपल्या अखत्यारित नसल्याचे सांगून टाळाटाळ केली आहे, असा आरोप करून महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष राऊ पाटील यांनी समितीच अद्याप नियुक्त झालेली नसल्याने घोडे अडले असल्याचे नमूद केले.

वेतन किती?

राज्यात सुमारे दीड लाख कामगार आहेत. त्यांना गेल्या पंचवार्षिक करारानंतर १२ टक्के पगारवाढ मिळाली होती. या वेळी २५ टक्के पगारवाढीची मागणी केली आहे. साखर उद्योगातील जुन्या कामगारास मासिक सुमारे २५ हजार, तर सुपरवायझरना ४० हजार रुपये पगार मिळतो. नवीन कामगारांना १९,५०० अधिक महागाई भत्ता असे सुमारे २६,५०० इतका पगार मिळतो.

हेही वाचा :कोल्हापुरात काँग्रेसला धक्का! आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

बोनसबद्दल समाधान

पंचवार्षिक पगारवाढ लांबल्याने साखर कामगारांमध्ये नाराजी आहे. ही स्थिती ओळखून विधानसभा निवडणुकीत विपरीत परिणाम होऊ नये यासाठी निवडणुकीत मोठ्या संख्येने उतरलेल्या साखर कारखानदारांनी यंदा चांगला बोनस देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा :कोल्हापूर: राजू शेट्टी यांनी चळवळीचा बाजार मांडला, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांची टीका

बेमुदत आंदोलनाचा इशारा

पंचवार्षिक पगारवाढ मिळावी ही मागणी शासनाकडे लावून धरली आहे. त्यासाठी पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयावर कामगारांनी मोर्चा काढून मागणीकडे लक्ष वेधले आहे. गेल्या महिन्यात सांगली येथे राज्यव्यापी मेळावा घेऊन संघर्षाची भूमिका घेण्यात आली. अजूनही शासनाने समितीच नेमलेली नाही. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. नवीन शासन आल्यानंतर त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यातून मार्ग निघाला नाही, तर १६ डिसेंबरपासून साखर कामगार बेमुदत आंदोलन सुरू करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिला आहे.