कोल्हापूर: देवगड -कर्नाटकातील निपाणी या राज्य महामार्गावर सरवडे येथे ट्रक आणि मोटारची मध्यरात्री धडक झाली. या अपघातात राधानगरी तालुक्यातील सोळंकुर गावातील तीन युवक ठार झाले तर चौघेजण जखमी झाले. यामुळे सोळंकुर गावावर शोककळा पसरली आहे. शुभम चंद्रकांत धावरे, आकाश आनंदा परीट, रोहन संभाजी लोहार अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर , ऋत्विक राजेंद्र पाटील, सौरभ सुरेश तेली, भरत धनाजी पाटील, संभाजी हणमंत लोहार हे जखमी झाले आहेत.

हेही वाचा : हातकणंगलेत ताराराणी पक्षाच्या जयश्री कुरणे यांची उमेदवारी

youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी
Magnav taluka , Four people drowned, Kundalika river,
रायगड : कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय

ऐन गणेशोत्सव काळात एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने सोळंकुर गाव शोकसागरात बुडाले आहे. सरवडे – मांगेवाडी हद्दीतील सूर्यवंशी मळा येथे हा मध्यरात्री अपघात घडला. सरवडे येथील नदीच्या पश्चिम वळणावर दोन्ही वाहनांची धडक झाली. अपघातानंतर बेदरकारपणे वाहन चालवणारा ट्रक चालक पसार झाला. याप्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र मनोहर लोहार यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Story img Loader