कोल्हापूर : तिलारी घाट ३१ ऑक्टोबर अखेर अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश गुरुवारी निर्गमित करण्यात आला. चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील ब-याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूचे संरक्षक कठडे जीर्ण, नादुरुस्त अवस्थेत असल्याने अपघात होण्याची शक्यता असते. घाटामधुन एस.टी. वाहतूक सुध्दा सुरु असून एखादा अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
हेही वाचा : विश्रांतीनंतर कोल्हापुरात पावसाचे आगमन; दमदार पावसाची प्रतीक्षा
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. हि स्थिती लक्षात घेऊन चंदगड तालुक्यातील परिते, गारगोटी, गडहिंग्लज, नागणवाडी, चंदगड, हेरे, मोटनवाडी फाटा, कळसगादे कोदाळी, भेडशी तिलारी घाट जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. वाहतूक सुरक्षा उपाययोजनेनुसार वाहतूक नियंत्रीत करण्याचे आदेश आहेत.