कोल्हापूर : काळम्मावाडी धरणक्षेत्रामध्ये बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. हे दोघेही निपाणी (कर्नाटक) येथील बारावीत शिकणारे वर्गमित्र होते. गणेश चंद्रकांत कदम व प्रतीक पाटील अशी त्यांची नावे आहेत. निपाणी येथील तेरा जण वर्षा पर्यटनासाठी काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथे आले होते. त्यातील गणेश चंद्रकांत कदम ह्या युवकाला पोहता येत नव्हते. तो काळम्मावाडी धरणासमोरील दूधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो डोहात बुडू लागला. ते पाहून प्रतीक पाटील हा त्याला वाचवण्यासाठी गेला असता तोही पाण्याचा प्रवाहात वाहून गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘स्वाभिमानी’च्या वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनास सुरुवात

घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक खंडू गायकवाड व सहकारी आले. पट्टीच्या पोहणारे लोक नदी पात्रात उतरून शोध कार्य घेत होते. पाऊस असल्याने पाण्याचा प्रवाह वाढत राहिला. त्यामुळे बचाव पथकाला अडथळा निर्माण होत होता.