कोल्हापूर : शहरामध्ये आज सकाळी शीरविरहित मृतदेह आढळला. तर सायंकाळी रंकाळा तलाव परिसरात एका सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला. या दोन्ही घटनांमुळे कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
रंकाळा तलाव परिसरात अजय शिंदे (वय ३०, राहणार यादव नगर ) या सराईत गुन्हेगारावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला चढवण्यात आला. काही क्षणांत सपासप वार करून सहा ते सात आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. रंकाळा चौपाटी परिसरात तलवारी, एडके, कोयते हत्यारे पडली होती.
हेही वाचा : मविआ – महायुतीच्या साखर कारखानदारांचे माझ्या विरोधात कारस्थान; राजू शेट्टी यांचा आरोप
पूर्ववैमनस्यातून हल्ला
घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी गाव घेतली आहे.खुनाचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे