कोल्हापूर : इतक्या वर्षाच्या कालावधीत छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केलेले नाही, अशा शब्दांत सदाशिवराव मंडलिक सहकारी कारखान्याचे संचालक वीरेंद्र संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना शिंदेसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना टीकेचे लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शाहू महाराज हे गादीचे खरे वारसदार नाहीत, मान गादीला मत मोदीला अशा त्यांच्या विधानावरून वादाचे काहूर उठले असताना आता त्यात मंडलिक घराण्यातील धाकट्या पातीने उडी घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त

कागलमधील भाजप पदाधिकारी मेळाव्यामध्ये बोलताना वीरेंद्र मंडलिक यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एकही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकले नाही. १५ वर्ष बंद पडलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आलेली नाही, अशी तोफ डागली. राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाटगे यांनी लौकिक वाढवला. त्यांनी छत्रपती शाहू साखर कारखाना उभा केला. तो यशस्वी चालवला असल्याने आम्हींही आमचा कारखाना तसा चालवण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही ते म्हणाले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family for not working like chhatrapati shahu maharaj css