कोल्हापूर : ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. वडाला प्रदक्षिणा घालून सूत गुंडाळून मनोभावे वटवृक्षाचे पूजन करून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करताना सुवासिनी दिसत होत्या. दिवसभर उपवास करून हे व्रत महिलांनी केले. एकमेकींना वाण देण्यात आले.

आज सकाळपासूनच शहरातील पेठा, गल्लीतून सौभाग्यालंकारांचा साज महिला घराबाहेर पडल्या. वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली. अनेक महिलांनी वडाचे रोप कुंडीत लावून घरातच वडाची पुजा करण्याला प्राधान्य दिले.

हेही वाचा : गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी कार्यालयावर ठाकरेसेनेचा मोर्चा, आंदोलक- पोलिसांत शाब्दिक चकमक

महालक्ष्मी मंदिर, कळंबा, फुलेवाडी, रूईकर कॉलनी, बावडा, शाहूपुरी, टाउन हॉल परिसर, माळी कॉलनी, शिवाजी विद्यापीठ परिसर येथील वडाच्या झाडाचे पूजन व वटपौर्णिमेचा विधी करण्यासाठी महिला असल्याचे चित्र दिसून आले.