कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पूरप्रवण क्षेत्राची पाहणी जागतिक बँकेच्या पथकाने केली. कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका क्षेत्र तसेच जिल्ह्यातील पूर बाधीत होणाऱ्या क्षेत्राला भेटी देण्यात आल्या. पथकातील प्रतिनिधी जोलंटा क्रिस्पिन-वॅटसन, सत्यप्रिया, आभास झा, दीपक सिंग, संगीता पटेल, सविनय ग्रोवर, वरुण सिंग, नेहा व्यास, युकिओ टनाका, विजयशेखर कलवकोंडा, शीना अरोरा, टीजार्क गॉल, डॉ. अभिजित शहा, रुमीता चौधरी, ऋषिकेश कोलटकर, अतुल खुराना यांनी महापालिका क्षेत्रातील पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली.
हेही वाचा : राजर्षी शाहू जयंतीनिमित्त कोल्हापुरात शोभा यात्रा, समता दिंडीला रिमझिम सरीतही भरघोस प्रतिसाद
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट दिली. बारा महिने चोवीस तास कार्यरत असलेल्या कक्षाच्या कामकाजाने पथकातील प्रतिनिधी प्रभावित झाले. अनुप करनाथ यांनी कारवार येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची माहिती घ्यावी, अशी सूचना केली. जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी अभ्यासपूर्वक आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या. मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, सांगली महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता उपस्थित होते.