कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील अकिवाट – बस्तवाड मार्गावरून जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने त्यातून प्रवास करणारे सात जण कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात बेपत्ता झाल्याचीधक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळतात दोन्ही गावातील ग्रामस्थ तसेच बचाव पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बेपत्ता नागरिकांचा बोटीच्या माध्यमातून शोध सुरू आहे.
याबाबतची माहिती अशी की, अकिवाट – बस्तवाड मार्गावरून एक ट्रॅक्टर जात असताना तो अचानक उलटला. ट्रॅक्टरमध्ये सुमारे सात प्रवासी होते. ट्रॅक्टर उलटल्याने हे प्रवासी पाण्याच्या प्रवाहात पडल्याने ते बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती प्रशासनाला समजतात प्रशासनाने यांत्रिकी बोटीच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांच्या माध्यमातून बेपत्ता लोकांची शोध मोहीम सुरू झाली आहे.