कोल्हापूर : कोल्हापूरात आज पावसाची उघडझाप सुरू राहिली. मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण भरत आले आहे. प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४० फुट अशी स्थिर राहिली. गेल्या दोन दिवसाच्या तुलनेने आज पावसाचा जोर किंचित कमी झाला होता. कोल्हापुरात आजही पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याची मोहीम सुरु होती. जामदार क्लब येथील ८ कुटुंब, त्यातील ३२ नागरिक स्थलांतरित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राधानगरी पुरेपूर

 राधानगरी धरण ९५ टक्के भरले आहे. रात्रीपर्यंत ते पूर्णतः भरले जाईल. त्यानंतर स्वयंचलित दरवाजातून उघडले जावून विसर्ग सुरू झाल्यानंतर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन ती धोका पातळीकडे जाण्याची शक्यता आहे.

शाळांना सुट्टी

 पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील २८ गावातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. महापुराचा फटका बसला होता अशा गावांचा यामध्ये समावेश आहे.

डोंगर खचल्याने घबराट

पन्हाळा तालुक्यातील नावली पैकी धारवाड धारवाडी येथे डोंगर खचला आहे. या भागातील जमिनीला दूरवर तडे गेले आहेत. काही घरांनाही तडे गेल्याचे समोर आले आहे. अशा घरातील लोकांनी साहित्य घेऊन सुरक्षित स्थळी जात आहेत.या परिसरात डोंगर खचण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. हवामान विभागाच्या सतर्क या ॲपवर या घटनेची नोंद झाली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in flood situation in kolhapur the hill panhala taluka ysh