गोकुळ दुध संघाने म्‍हैस दूध प्रतिलिटर २ रुपये व गाय दूध १ रुपये खरेदी दरात वाढ केली आहे. तर फुल क्रीम दूध विक्री दरात २ रुपये प्रतिलिटर वाढ केली आहे.

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक (गोकुळ) संघाची संचालक मंडळ बैठक होवून त्यामध्ये ही वाढ १ ऑगस्ट पासून लागू केली जाणार आहे, अशी माहिती संघाचे अध्‍यक्ष विश्‍वास पाटील यांनी शनिवारी दिली.

यापुढे म्‍हैस दूध खरेदी दर ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर ४५.५० रुपये दर राहील. गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर ३० रुपये असा दर राहील.

फुल क्रीम दूध विक्री दरात २ रुपये प्रतिलिटर वाढ –

कोल्हापूर, मुंबई, पुणे विभागामध्‍ये वितरीत होणाऱ्या फुल क्रीम दूध विक्री दरात २ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात येणार आहे. गाय दूध,टोण्‍ड दूध, स्‍टँडर्ड दूध विक्री दरामध्‍ये कोणतीही वाढ करण्‍यात आलेली नाही. सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत येणार आहेत.

Story img Loader