कोल्हापूर : धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीमध्ये दिवसभरात एक फूट पाणी वाढले आहे. ७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.धरण क्षेत्रात पावसाची गती कायम राहिली आहे. जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पश्चिमेकडील शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यांमध्ये पाऊस जोरदार पडत आहे. पूर्वेकडील भागात पावसाची उघडझाप आजही कायम राहिली आहे.

जीवघेणी वाहतूक

जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधारे पाण्याखाली गेल्यानंतर तेथे वाहतूक करू नये अशा सूचना आहेत. तरीही जीव धोक्यात घालून वाहनधारक बंधाऱ्यावरील पाण्यात वाहने घालत आहेत.पंचगंगा नदीचे पाणी पातळी सोमवारी सायंकाळी १८ फूट ४ इंच होती. शिंगणापूर ,राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि कासारी नदीवरील असे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून १०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in water level of rivers in kolhapur district amy
First published on: 02-07-2024 at 06:26 IST