शिरोळ, हातकणंगले या जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात असलेल्या कृष्णा,वारणा, पंचगंगा या तिन्ही नद्यांच्या पाणीपातळीत दररोज वाढ होत आहे. गत सहा दिवसांपासून हजेरी लावलेल्या पावसाने चांगलाच जोर धरला असून, तिन्ही नद्यांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत चालली आहे. शुक्रवारीसायंकाळी ६ वाजता इचलकरंजी येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी ६४ फुटांवर पोहोचली असून, ती इशारा पातळी असलेल्या ६८ फुटांच्या दिशेने सरकत होती.

जुना पूल पूर्णत: पाण्याखाली गेला असून रेंदाळ-हुपरी मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, पावसामुळे इचलकरंजी शहरात चार ते पाच ठिकाणी झाड, भती आणि घर कोसळल्याच्या घटना घडल्या असून, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. नगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. पूरपट्टय़ातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने सगळीकडे पुन्हा पाणीच पाणी झाले आहे. नदीकाठावरील घाट आणि वरदविनायक मंदिर, स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत दमदार पावसामुळे चांगलीच वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकाठ परिसर जलमय बनला आहे. पंचगंगा यंदा दुसऱ्या पात्राबाहेर पडली असून, जुना पूलही पूर्णत: पाण्याखाली गेला आहे. चांदोली धरणाचे दरवाजेही रात्री उघडण्याची शक्यता असल्याने कर्नाटक मार्गावरील वाहतूकही बंद पडण्याची शक्यता आहे.

butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
khambataki ghat tunnel work loksatta news
खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान
Increasing the height of Almatti Dam poses a flood risk to western Maharashtra
अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने पश्चिम महाराष्ट्राला पुराचा धोका?
loksatta readers feedback
लोकमानस: चाचणीला परवानगी मिळालीच कशी?
Safe Waterway , Speed ​​Boat issue , Alibaug, Gharapuri ,
स्पीड बोटींचा स्वैरसंचार, अतिधाडस; अलिबाग, घारापुरीसाठी सुरक्षित जलमार्ग निश्चित करण्याची पर्यटकांची मागणी
almatti dam flood
कर्नाटकच्या कृष्णाकाठ योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका

पंचगंगेची इशारा पातळी ६८ फुटांवर असून धोका पातळी ७१ फुटांवर आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापनाकडून मळेभागातील नागरिकांना पुनर्वसन छावणीत स्थलांतर केले जात आहे.

तांबेमाळ, जवाहरनगर, नवीन नगरपालिकांसह विविध भागांत भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे जीर्ण झालेल्या भती आणि घरांमुळे धोका असल्याने पालिकेने अशा घरांना नोटिसा लागू केल्या आहेत. तर पारिख कॉलनी परिसरात सकाळी एक झाड पडले. तांबेमाळ परिसरात एका घराचे छप्पर पूर्णत: एका बाजूला कलल्याने संबंधितांस नोटीस देण्यात आली आहे.

जवाहरनगर परिसरात विष्णुकुंज गोदामनजीक असलेले चंद्रकांत लायकर यांच्या मालकीच्या रिकाम्या शेडची िभत पडली. तर याच परिसरात मारुती मंदिराजवळ रिकाम्या शेडचीच भत पडली आहे. तर नवीन नगरपालिकेची गुरू चित्रमंदिर लगत असलेली पाìकग परिसरातील भत पडली आहे.

 

Story img Loader