कोल्हापूर : मराठा प्रश्नावर मराठवाड्यातील मनोज जरांगे यांचे उपोषण संपत असताना आता पश्चिम महाराष्ट्रातील याच मुद्द्यावर गांधी जयंती पासून उपोषणाला सुरुवात होणार आहे. २ ऑक्टोंबर रोजी सकल मराठा समाजातर्फे एडवोकेट बाबा इंदुलकर, दिलीप देसाई हे छत्रपती शिवाजी चौकात आमरण उपोषण करणार आहेत. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने अनेक अन्य मराठा बांधव सहभागी होणार आहेत. हा निर्णय मंगळवारी विठ्ठल मंदिरात झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी इंदुलकर म्हणाले, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचे कुजबूज सुरू झाल्यानंतर सत्तेतील बडे राजकीय नेते ओबीसींना रस्त्यावर उतरत आहेत. मराठा समाजावर बोलण्यास लावत आहेत. हे मोडीत काढले जाईल. त्यासाठीच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवीकरण इंगवले यांनी आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी केली. यावेळी रुपेश पाटील, किशोर घाटगे, सुनीता पाटील, अनिल घाटगे आदींची भाषणे झाली.
हेही वाचा >>>कोल्हापूर : बेडगचा प्रश्न पुन्हा तापला; आंबेडकरी समाजाच्या मुंबई पदयात्रेस माणगावातून सुरुवात
लवकरच चंगली बातमी
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी सरकार कोणाचे असले तरी मराठा समाजाचे फसवणूक झाली आहे, असा उल्लेख करून मराठा समाज आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. लवकरच आरक्षण बाबत बातमी येईल . त्यामुळे समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही,असे सांगितले.