कोल्हापूर : इचलकरंजीतील ताराराणी आघाडीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतरही आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. येत्या मंगळवारी ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इचलकरंजी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रकाश आवाडे हे ताराराणी आघाडीकडून अपक्ष म्हणून विजयी झाले होते . त्यानंतर त्यांनी राज्यातील राजकारणात भाजपला पाठिंबा दिला होता. तर आता राज्यात महायुतीचे सरकार आहे.

हेही वाचा…महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता; भाजपकडून मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची उमेदवारी पुन्हा खासदार धैर्यशील माने यांना दिली आहे. या उमेदवारीच्या विरोधात प्रकाश आवाडे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. तर काल पत्रकार परिषद घेऊन एकदा लोकसभा लढवणार आणि जिंकणार असा निर्धार केला होता. आवाडे यांच्या सोबत विनय कोरे व राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष आमदार असल्याचे सांगितले जाते. आवाडे यांची उमेदवारी म्हणजे महायुतीतील बंडखोरी मानली जात आहे.

हेही वाचा…कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी

या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापुरात आले होते. मुख्यमंत्री शिंदे व प्रकाश आवाडे यांच्या चर्चा झाली. यावेळी आमदार विनय कोरे, माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. या चर्चेनंतर बोलताना आमदार आवडे म्हणाले, आपली चर्चा झाली असली तरी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहे. यामुळे महायुती अंतर्गत अडचणी अजूनही कायम असल्याचे दिसत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent mla prakash awade to contest hatkanangle lok sabha seat despite meeting with cm eknath shinde psg
Show comments