कोल्हापूर : दोन गव्यांच्या झुंजीमध्ये एका गव्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार पन्हाळा तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी वन विभागाने घटनास्थळी पाहणी केली. मृत गव्याच्या अंगावर शिंगांच्या खुणा असल्याने त्याचा मृत्यू झुंजीमध्ये झाला असल्याचे सांगण्यात आले. बाजार भोगाव येथील तानाजी सवू पाटील यांच्या शेतामध्ये काल रात्री गव्याची झुंज झाली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. त्याच्या डोक्यात, शरीरावर शिंगांच्या खुणा आदळल्या. आज सकाळी पाटील शेतामध्ये आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. याची माहिती त्यांनी वन विभागाला दिली. वनपाल अनंता पाटील, वनरक्षक पुंडलिक कांबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रानभरे यांनी तपासणी केली. पाटील यांच्या शेतातील पाच गुंठे ऊस जमीनदोस्त झाला आहे. वाढत्या उन्हामुळे गवे अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत आणि शेतामध्ये वावरत आहेत. त्यातून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा