लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोल्हापूर : सन २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील जखमा आम्ही अजूनही विसरलेलो नाही, असे म्हणत स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी शनिवारी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. त्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले संभाजीराजे अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून पराभूत झाले होते.

आज पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे. आम्ही याआधी विधानसभा निवडणूक लढवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पण अनेक ठिकाणाहून लोकसभा निवडणुकी लढवली पाहिजे अशी मागणी होत आहे. ती विचारात घेऊन स्वराज्य संघटना लोकसभा निवडणूक लढवणार आहे. वेळ आल्यावर त्याची प्रचिती दिसेल.

आणखी वाचा-कोल्हापूर : पावनगडावरील अनधिकृत मदरशा अखेर जमीनदोस्त

पावनगडावरील मदरसा जमीन दोस्त करण्यात आला. याविषयी ते म्हणाले, कोणत्याही किल्ल्यावर अशा कोणत्याही नवीन बाबी होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. इतिहासाची जपणूक होण्याच्या दृष्टीने पावली पडली पाहिजेत. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले होते, असेही ते म्हणाले.