इचलकरंजी येथे आयोजित मराठा आरक्षण मेळाव्यात इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याबद्दल टीका केल्यामुळे उपस्थितांनी घोषणाबाजी करत त्यांचे भाषण बंद पाडले. या वेळी त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. दरम्यान, गोंधळातच आटोपलेल्या या मेळाव्यातून बाहेर पडताना सावंत यांना संतप्त कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इचलकरंजीत मराठा आरक्षण मागणीसाठी मंगळवारी रात्री एका मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी बोलताना सावंत यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मेळावा आयोजनामध्ये सहभागी असलेल्या उपस्थितांनी त्यांच्या भाषणाला विरोध दर्शवला. पण, सावंत यांनी त्यांचे भाषण सुरूच ठेवल्याने मेळाव्यास उपस्थित कार्यकर्त्यांनी थेट व्यासपीठावर जात सावंत यांना विरोध तसेच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न सुरू केला. या कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत माफी मागण्याची मागणी केली. हा गोंधळ वाढल्यावर संतप्त कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांनी सावंत मेळाव्यातून बाहेर पडताना त्यांना मोठी धक्काबुक्की केली. या मेळाव्यास उपस्थित असलेल्या आमदार नीतेश राणे यांची गाडीही कार्यकर्त्यांनी रोखून धरली. पोलिसांनी हस्तक्षेप करुन संतप्त कार्यकर्त्यांना बाजूला केले. या घटनेनंतर अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

शिवप्रतिष्ठान, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आदी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मलाबादे चौकात इंद्रजित सावंत याच्या विधानाच्या निषेधार्थ निदर्शने केली. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली. कोल्हापूर येथे सावंत यांनी, आपल्याला धक्काबुक्की करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.