कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेत विकासकामे न करताच बिले आदा करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. त्यामुळे आधीची इचलकरंजी पालिकेतील मागील दहा वर्षांतील संपूर्ण कामांची आर्थिक गुन्हे अन्वेषण अथवा इडी मार्फत सखोल चौकशी करावी. माजी नगरसेवक संजय तेलनाडे, मक्तेदार व अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी लक्षवेधी सूचना आमदार प्रकाश आवाडे यांनी बुधवारी अधिवेशनात मांडली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब असल्याचा उल्लेख करून या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी करण्यात येईल, असे सांगितले.

शाळांची दुरुस्ती, मैदान विकसित करणे आदी कामे कागदोपत्रीच केल्याचे दाखवून ९८ लाखांची देयके आदा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात लक्षवेधी मांडताना आमदार आवाडे म्हणाले की, मागील दहा वर्षांत पालिकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे. माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात अनेक गंभीर प्रकरणे उघडकीस आणली आहेत. मक्तेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने हे घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

हेही वाचा – “अतिशय निर्लज्ज, विकृत, बेताल…”, संभाजी भिडेप्रकरणी विधान परिषेदत विरोधकांचा गदारोळ; फडणवीस म्हणाले…

ट्रॉलीभर कागदपत्रे हलवली

याची माहिती मागविली असताना ट्रॉलीभर कागदपत्रे अन्यत्र हलविण्यात आली आहेत. त्याचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न करणार्‍यांना धमकावण्यात आले. या गैरव्यवहारात दुहेरी मोका दाखल असलेल्या माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यासह शैलेश पोवार, विनय राठी, संजय पाटील, इमरान मैंदर्गी यांच्यासह आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांचा सहभाग असल्याने त्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे आवाडे म्हणाले.

हेही वाचा – नितीन देसाईंनी आत्महत्या का केली? सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले…

आमदारावर खोट्या गुन्ह्यासाठी सुपारी

इचलकरंजी पालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे मी उघडकीस आणत असल्याचे पाहून माजी नगरसेवक तथा दुहेरी मोका अंतर्गत कारवाई झालेल्या गुंड संजय तेलनाडे याने एका महिलेला माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी १५ कोटी रुपयांची सुपारी दिली आहे, असा सनसनाटी आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे आवाडे यांनी सांगितले.