कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैदी संतोष पोळ याने बनावट पिस्तुल घेऊन कारागृहात चित्रफीत तयार केल्याप्रकरणी रविवारी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांचीही तडकाफडकी अहमदनगरला बदली करण्यात आली. त्यांच्या जागी दत्तात्रय गावडे यांनी पदभार स्विकारला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आतापर्यंत तुरुंगाधिकाऱ्यासह १६ जणांना निलंबित केले आहे. बंद लिफाफ्यातील बदलीचा लखोटा हाती पडल्यानंतर शेळके यांना बदली झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

कळंबा मध्यवर्ती कारागृहातील चित्रफीत प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते . वाई (जिल्हा सातारा) येथील सीरियल किलर डॉ. संतोष पोळ हा कळंबा कारागृहात बंदिस्त आहे. कारागृह प्रशासनाला अडकचणीत आणण्यासाठी पोळ याने अनाधिकृतपणे मोबाईल आत आणला. त्यानंतर कारागृहात मोबाईलच्या साहाय्याने व्हिडीओ क्लिप तयार केली. सातारा येथे न्यायालयीन कामासाठी गेल्यावर मोबाईलचे मेमरी कार्ड एका नातेवाईला दिले. २७ नोव्हेंबर रोजी ही चित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात खळबळ माजली. त्यातून कळंबा कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Nagpur Swapnils Bits Gang emerges as otorious gangs vanish from the city
शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात ‘बिट्स गँग’चा उदय, सत्ताधारी नेत्याच्या छत्रछायेत स्वप्निलचे दुष्कृत्य
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
marathi actress spruha joshi sister kshipra joshi baby shower ceremony photos viral
स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…

कारागृहा प्रशासनाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी कोल्हापुरात येऊन या प्रकरणाची कसून चौकशी केली. त्यावेळी डॉ. पोळने बनावट पिस्तुलच्या सहाय्याने ही चित्रफित केल्याचे स्पष्ट झाले. मात्र कारागृहात मोबाईल आला कसा याची चौकशी सुरु असताना त्यामध्ये दोषी आढळलेले तुरुंगाधिकारी सचिन पाटील यांच्यासह १५ कर्मचारी अशा १६ जणांना निलंबित करण्यात आले आहे.

दोष न तरीही …

कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांचा या प्रकरणात काहीच दोष नाही,मात्र कारागृहातील १६ कर्मचारी निलंबीत झाले आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. या चौकशीत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, म्हणून त्यांची बदली केल्याचे समजते. दोन महिन्यानंतर त्यांची पदोन्नती होणार असताना तडकाफडकी बदलीला सामोरे जावे लागले.

Story img Loader