कोल्हापूर : कराड शहरात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात कराड शहर पोलिसांना मंगळवारी यश आले आहेत. यामध्ये इचलकरंजी येथे अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला बबलू ऊर्फ विजय संजय जावीर (वय ३२ रा. शहापुर इचलकरंजी), निकेत वसंत पाटणकर (रा. गोडोली जि. सातारा,) सुरज नानासो बुधावले (रा. विसापुर पुसेगाव जि. सातारा), राहुल अरुण मेनन (रा. केरळ सध्या रा. विद्यानगर कराड), आकाश आनंदा मंडले (रा. खटाव जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. त्यांच्याकडून ३ देशी बनावटीचे पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, एक धारधार सुरा व दोन कोयते आणि इतर दरोड्याचे साहित्य असा ३ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या टोळीने इचलकरंजीतील एका माजी नगरसेवकाच्या खूनाचा प्लॅन आखला असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, सोमवार (२० मे) रोजी दुपारच्या सुमारास कराड शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथक शहरात गस्त घालत असताना विद्यानगर जयराम कॉलनी येथे पाचजणांची टोळी सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा >>> महिला कारकूनने ३० हजाराची लाच स्वीकारली; कागल तालुक्यात कारवाई

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना

चित्तथरारक पाठलाग

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अनिल स्वामी, पोलीस शिपाई महेश शिंदे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांची चाहूल लागताच टोळी पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पथकाने चित्रपटाला शोभेल असा चित्तथरारक पाठलाग करत अन् जिवाची पर्वा न करता टोळीच्या मुसक्या आवळल्या.

बबलु जावीर याच्यावर खुन, दरोडा, जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ला असे ६, निकेत पाटणकर याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, मारहाण असे ९, सुरज बुधावले याच्यावर खुन, आर्म अ‍ॅक्ट असे १२, राहुल मेनन याच्यावर खुन, घरफोडी, दरोडा, जबरी चोरी असे ४, गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या मुसक्या आवळून कराड शहर पोलीसांनी आपली कार्यक्षमता सिध्द केली असल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख समीर शेख यांनी दिली.

हेही वाचा >>> पावसाने कोल्हापूरला पुन्हा धुतले; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात घरांचे पत्रे उडाले , धान्य भिजले

यांनी बजावली कामगिरी

ही धडाकेबाज कामगिरी पोलीस निरीक्षक अरुण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोहित फार्णे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सहा. फौजदार गोवारकर, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, प्रविण काटवटे, सचिन सुर्यवंशी, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अनिल स्वामी यांच्या पथकाने केली.

तो नगरसेवक कोण?

मुसक्या आवळण्यात आलेल्या टोळीकडून पूर्ववैमनस्यातून इचलकरंजीतील एका माजी नगरसेवकाच्या खुनाचा प्लॅन आखला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.  त्यामुळे पोलिसांकडून त्यादृष्टीने तपास केला जात आहे. या माहितीमुळे तो नगरसेवक कोण याची चर्चा इचलकरंजी शहरात चांगलीच रंगली आहे.

Story img Loader